आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुर्तीजापुर-कारंजा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ग्राम दहातोंडा फाट्याजवळ भरधाव ट्रकने दूचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. हा अपघात आज (ता. 10) शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
पंधरा फूट फेकला गेला तरुण
धडक एवढी भीषण होती जवळपास 10 ते 15 फूट रस्त्याच्या कडेला नालीत मृत विनोद वानखडे दूचाकीसह फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पांडव, पोलीस उपनिरीक्षक मानकर, पो. हे. काँ. गजानन थाटे, पो. काँ. नितेश मद्दी घटनास्थळी पोहोचले होते. अपघात झाल्यानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका
मृतांना येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. सदर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून याबाबत तातडीने दखल घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस स्टेशन ठाणेदार पांडव करीत आहेत.
असा झाला अपघात
मूर्तिजापूरकडून कारंजाकडे जुपिटर मोटर सायकल (क्र.एम. एच.-37-एस-5734) ने जात असताना मूर्तिजापूर कारंजा महामार्गावरील दहातोंडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेला ट्रक क्रमांक (एम.एच.-40-टी.डी.-2283) या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये मोटरसायकल वरून जात असलेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मृतकांजवळ मिळालेल्या ओळख पत्रावरून मृतक विनोद वासुदेवराव वानखडे व सविता विनोद वानखडे रा.मेहा (धनज) ता. कारंजा जि.वाशिम येथील रहिवासी असल्याचे समजले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.