आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प:मेडाच्या सूचनेला भेलचा ठेंगा; सौर प्रकल्पाचे कार्यान्वयन नाहीच

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महान जलशुद्धीकरण केंद्र आणि शिलोडा मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प ३० जुलैच्या आत कोणतेही कारण न सांगता कार्यान्वित करा, या मेडाने दिलेल्या सुचनेला भेल कंपनीने ठेंगा दिला. ३० जुलै नंतरही कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे कार्यान्वय झालेच नाही. त्यामुळे मागील आठ महिन्यापासून महापालिकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पाचा डीपीआर मेडा (महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण) मार्फत शासनाकडे पाठण्यात आला होता. १४०० किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. यापैकी ९९० केव्ही क्षमतेचा प्रकल्प महान येथील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तर उर्वरित प्रकल्प शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्र परिसरात उभारण्यात आला. मेडा ने हे काम भेल कंपनीला दिले होते. दोन्ही सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. केवळ नेट मिटरींगमुळे या प्रकल्पाचे कार्यान्वयन रखडले आहे. या प्रकल्पासाठीचा ६ कोटीचा निधी यापूर्वीच वळता केला आहे. तसेच महाऊर्जाकडून मागीतलेला ४७ लाख रुपयाच्या अतिरिक्त निधी पैकी ३२ लाख ९० हजार रुपयाचा निधी मार्च २०२२ ला वळता केला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्ण होवून सात महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला असताना, हे दोन्ही प्रकल्प सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.

या अनुषंगाने मेडाने व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये भेल कंपनीला कोणत्याही परिस्थितीत ३० जुलै पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने महावितरणे नेट मिटरची टेस्टिंग घेण्याबाबतचे पत्र भेल कंपनीला दिले होते. मात्र ३० जुलै नंतरही प्रकल्पाचे कार्यान्वयन झाले नाही.

वीज देयकाचा महापालिकेला करावा लागताे भरणा
सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १५ लाखाचे तर शिलोडा येथील मलजलशुद्धीकरण केंद्रातील ३ लाख रुपयाचे वदि्युत देयकाचा भरणा मनपाला करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...