आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन उत्साहात:बोरगाव मंजूत शिवस्मारकाचे भूमिपूजन उत्साहात; स्मारकाचे भूमीपूजन व फलकाचे अनावरण

बोरगाव मंजू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडव्याच्या पर्वावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रेणुका नगरातील नियोजित जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन व फलकाचे अनावरण केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे, अशी शिवप्रेमींची इच्छा होती. त्याप्रमाणे शिव प्रतिष्ठानकडून स्मारक समितीची स्थापना केली. समितीने शिव स्मारकासाठी रेणुका नगरातील जागेची मागणी ग्रामपंचायतीकडे केली. सरपंच अनिता सुनील खेडकर, उपसरपंच बेबीनंदा बंडू गवई, ग्रामविकास अधिकारी विनोद वसू व ग्रामपंचायत सदस्यांनी रेणुका नगरातील जागा दिली.

या वेळी स्मारकाचे भूमीपूजन करून फलकाचे अनावरण सुनील खेडकर व स्मारक समितीचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून केले. स्मारक समिती सदस्य गजानन भटकर, संजय वानखडे, विजय देशमुख, देवानंद मोहोड, रवी विल्हेकर, सुबोध गवई, दादाराव सुल्ताने, ज्ञानेश्वर वानखडे, मझर, भावराव वानखडे, रमेश समुद्रे, गुरूप्रसाद तायडे, मनोज पाटील, रवी बागडे, बंडू गवई, श्याम राऊत, मनोहर उमाळे, सागर तायडे, धनंजय देशमुख, सुहास सोनोने, बायस्कर महाराज, नीलेश शर्मा, अभिजित निवाने, अविनाश महाजन, अमोल विल्हेकर, हेमंत कंटाळे, गौरव देशमुख, विलास गांवडे, सखाराम वानखडे, साखरे, वाघमारे, विशाल पिलात्रे, कुलदीप दळवी, अभिजित निवाने, सागर तायडे, भूषण मेहरे, रवी मोंढे, दीपक काळे, रणजित देशमुख, प्रितम जाधव, नितीन बायस्कर, अनंता देशमुख यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा झाला. या वेळी शिवप्रेमी, शिवभक्तांचा सहभाग होता. ठाणेदार सुनील सोळंके यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या वेळी पोलिसाचा चोख बंदोबस्त होता.

बातम्या आणखी आहेत...