आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताज्जुद्दीन बाबा उरूस:रेल्वे 18 अनारक्षित डब्याची गाडी चालवणार; भुसावळ प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथे साजऱ्या होणाऱ्या ताजुद्दीन बाबा उरुसानिमित्त भुसावळ विभागाकडून 18 अनारक्षित डब्याची रेल्वे चालवण्यात येणार आहे. ही गाडी नाशिकहून 19.00 वाजता सुटेल आणि 06.20 वाजता अजनीला पोहोचेल.

नागपूर येथे ताजुद्दीन बाबाचा उर्ज दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. एक महिना चालणाऱ्या उर्सनिमित्त देशभरातून लाखो भाविक येथे येतात. यासाठी नियमित रेल्वेवरील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तारखांत बदल

भुसावळ - देवळाली आणि भुसावळ - वर्धा दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित गाड्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. भुसावळ - देवळाली - भुसावळ 11114 ही गाडी १६ सप्टेंबर ऐवजी १५ सप्टेंबरपासून दररोज भुसावळ येथून सुटेल. ट्रेन क्र. 11113 सप्टेंबर १७ ऐवजी १६ सप्टेंबरपासून दररोज देवळाली येथून सुटेल. याशिवाय भुसावळ - वर्धा - भुसावळ गाडी क्रमांक 11121 भुसावळ येथून १५ सप्टेंबर ऐवजी १६ सप्टेंबरपासून दररोज सुटेल. गाडी क्रमांक 11122 वर्धा येथून १६ सप्टेंबर ऐवजी १७ सप्टेंबरपासून दररोज सुटेल. प्रवाशांनी बदलेल्या तारखां लक्षात घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तिसऱ्या रेल्वे लाइनचे निरीक्षण

मुख्य सुरक्षा अधिकारी यांची विशेष गाडी भुसावळ येथे सकाळी ५.३०मिनिटांनी पोहचली. लगेच ८ वाजता जळगांवसाठी निघाली नंतर ३ लाईनवर आल्यानंतर विशेष गाडी म्हसावाद येथे निघाली. नंतर ६ मोटर ट्रॉलीने सर्व ऑफिसर निरिक्षणासाठी निघाले. मुख्य सुरक्षा अधिकारी मनोज अरोरा यांनी निरीक्षण १-१ किलोमीटर अंतरावर निरीक्षण केले. तसेच मध्ये ब्रिजचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी काही सूचनाही दिल्या. आज पहिल्या फेजमध्ये भुसावळ ते माहेजीपर्यंत निरीक्षण झाले. दुसऱ्या दिवशी माहैजी ते पाचोरा निरीक्षण राहील. निरिक्षण दरम्यान मुंबईचे व भुसावळ येथील अधिकारी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...