आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलचा ‘ट्रेन्ड:‘कोविड’नंतर पुन्हा आला सायकलचा ‘ट्रेन्ड’ ; दररोज 26 सायकलींची होते विक्री

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड काळानंतर रोगप्रतिकारक शक्तीबाबत सजग नागरिकांकडून व्यायामात सायकलचा वापर वाढला आहे. परिणामी सायकल विक्रीत सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय बनावटीच्या सायकलसह महागड्या इम्पोर्टेड सायकलींनाही शहरात मागणी असून दिवसाला सरासरी २६ सायकलींची विक्री होत असल्याचे विक्रेते सांगतात. कोविड संकटामुळे रोगप्रतिकार शक्ती आणि व्यायामाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले. त्यामुळे अनेकांनी व्यायामासाठी सायकलचा पर्याय निवडला. युवक, युवतींसह ज्येष्ठ नागरिक,शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील आदी विविध घटकांकडून शहरात सायकलची मागणी आणि वापर वाढला आहे. महिन्याला ८०० सायकलींची विक्री विक्रेते सांगतात की, अकोला शहरात नवीन सायकलींची विक्री करणारे ७ ते ८ मोठे प्रमुख शोरूम आहेत. येथून अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह लगतच्या जिल्ह्यातही सायकल विक्री होते. शहरातून महिन्याला सरासरी १८०० ते २००० सायकली विकल्या जातात. त्यातील सुमारे ८०० सायकली एकट्या अकोला शहरात घेतल्या जातात, असे विक्रेते पवन शर्मा सांगतात. किमतींमध्ये वाढ : इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च, वाढलेली एक्स्पोर्ट ड्युटी तसेच रॉ मटेरियलच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे सायकलच्या किमतींमध्ये १५ ते १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधन दरवाढीवर पर्याय : वाढत्या इंधनदरांमुळेही नागरिकांचा सायकल वापरण्याकडे कल वाढला आहे. व्यायामाचा उद्देश वगळता दैनंदिन ४ ते १० किलोमीटरच्या स्थलांतरासाठी साध्या सायकलचा वापर वाढल्याचे विक्रेते सांगतात.

शहरात मिळते ५ लाख ४० हजारांची सायकल अकोला शहरात सरासरी पाच हजारांपासून ते ५ लाख ४० हजार रुपयांपर्यंतची सायकल उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय ब्रँण्डच्या विदेशातून येणाऱ्या सायकलीही शहरात विकल्या जातात. महागडय़ा सायकली या सायकलस्वाराची उंची, वजन, हात, खांदे आणि पायांची लांबी आदीचे मेजरमेंट घेऊन सायकलची फ्रेम सिलेक्ट केली जाते. ही सायकल विनाथांबा २०० किलोमीटपर्यंत चालवता येईल, एवढी कम्फर्ट बनवली जाते.

बातम्या आणखी आहेत...