आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनविसेला भगदाड:मनसेच्या शॅडो कॅबिनेटचे वनमंत्री आदित्य दामले शिवसेनेत; अकोल्यात मनसेला धक्का

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोल्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दामले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे राज्यात मनसे आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे मनसेचे शॅडो कॅबिनेटचे वनमंत्री आदित्य दामले यांनी आदित्य ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे. दामले यांच्या प्रवेशाने पर्यटन मंत्री ठाकरे यांनी मनसेला मोठा धक्का दिल्याची चर्चा अकोल्यात ऐकायला मिळत आहे.

मनसे स्थापनेच्या आधीपासून दामले राज ठाकरेंसोबत

अकोल्यातील मनसेचे शॅडो कॅबिनेट मंत्री आदित्य दामले यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. तर दामले यांनी हातात शिवबंधन बांधल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. आदित्य दामले हे राज ठाकरेंसोबत मनसे स्थापनेच्या आधीपासून कार्य करताय. राज ठाकरे यांच्या भारतीय विद्यार्थी सेनेते चांगलेच सक्रिय होते. ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यावर आदित्य दामले हे मनसेत दाखल झाले होते.

यानंतर त्यांच्यावर राज ठाकरेंनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या. यात मनविसेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदासह, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या प्रदेश सचिव पदावर आणि कामगार सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावरही नियुक्ती केली. दोन वर्षांपूर्वी मनसेने आदित्य दामले यांची शॅडोकॅबिनेटमध्ये वन, पर्यावरण मंत्री पदावर नियुक्ती केली होती. आता सर्व पदांचा राजीनामा देत आदित्य दामले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?
शॅडो कॅबिनेट एक प्रकारे प्रति सरकार प्रमाणे काम करते. मात्र, त्यांना सरकारचे अधिकार नसतात.
विरोधी पक्षाने नेमून दिलेला प्रति कॅबिनेट मंत्री सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांवर नजर ठेवण्याचे काम करतो. शॅडो कॅबिनेट ही पाश्चात्य संकल्पना आहे. मनसेचा वर्धापन दिनी मनसेने आपले शॅडो कॅबिनेट जाहिर केले होते.

बातम्या आणखी आहेत...