आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात दुर्घटना:जेसीबीमध्ये झोपलेला बिहारचा युवक गेला वाहून, तिघे सुरक्षित

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला तालुक्यामध्ये गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर असलेला एक युवक वाहून गेला आहे. हा युवक कुरणखेड परिसरातील एका मोठ्या नाल्याच्या परिसरात रात्री जेसीबीमध्ये झोपलेला होता. नाल्यातून आलेल्या प्रचंड पाण्याच्या लोढ्यांमध्ये रात्री दीडच्या सुमारास अचानक जेसीबी कोसळली. यामध्ये हा युवक वाहून गेला.

अशी घडली घटना

अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. अकोला तालुक्यातील कुरणखेड काटेपूर्णा नदीच्या जवळ एक मोठा नाला आहे. येथे गुरुवारी दिवसभर दोन जेसीबीद्वारे काम सुरू होते. रात्री काम झाल्यानंतर कार्यरत चार मजूर याच जेसीबींमध्ये झोपी गेले. एका जेसीबीमध्ये दोन मजूर होते. रात्री पावसाचा जोर वाढला. नाल्याचा पाण्याचा ओढा जेसीबीपर्यंत पोहचला. मशीन हळुहळू पाण्यामध्ये जात असल्याचा भास एकाला झाला. त्याने आपल्या जेसीबीमध्ये असलेल्या व्यक्तीला उठवून बाहेर काढले. त्यांनी दुसऱ्या जेसीबीमध्ये झोपलेल्या मजूरांना उठविण्याचा प्रयत्न केला. यातील एकाला कसेतरी बाहेर काढण्यात यश आले. पण दुसरा प्रचंड झोपेत होता, त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना जेसीबी उलटला. यामुळे युवक पाण्यामध्ये वाहून गेला.

शोधकार्य सुरू

घटनेमधील चारही व्यक्ती बिहार येथील आहेत. तिघांनी झालेल्या प्रकार तत्काळ मालकाच्या कानावर घातला. मात्र, रात्री पावसाच्या जोर अधिक असल्यामुळे शोधकार्य हाती घेता आले नाही. सकाळी कुरणखेड परिसरातील दोन आपत्कालीन पथक आणि पोलिसांच्या मदतीने युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. चार जेसीबी शोधकार्यात जुंपलेले आहेत. दुपारी दीड वाजतापर्यंत मृताचा शोध लागलेला नव्हता. यावेळी जवळपासच्या गावातील लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...