आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वाशिम जिल्ह्यात दुचाकीला भरधाव बसची धडक; युवकाचा जागीच मृत्यू

मानाेरा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस महामार्गावरील मानोरा ते विठोली दरम्यान शहराजवळ दुपारी तीन वाजता झालेल्या भीषण अपघातात विठोली येथील युवकाला प्राण गमवावे लागले. दिग्रस आगारातील बस क्रमांक एमएच १४ बीटी ०६७१ ही दिग्रसहून मानोऱ्याला येत असताना समर्थ वाईन बारसमोर मानोराकडून दिग्रसच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक एमएच ३७ पी ६०२० वरील प्रवीण बबन कोल्हे (२८) याला बसची समोरून धडक लागल्याने युवक खाली पडला व बसच्या समोरील वाहकाच्या भागाकडील चाकाखाली आला आणि जागीच ठार झाला.

बातम्या आणखी आहेत...