आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक जानेवारीपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्ती:दुचाकीधारकांनो, हेल्मेट वापरा; अन्यथा कारवाईला सामोरे जा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘प्राणांतिक अपघात कमी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी घेतला आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाईल,’ असे दुतोंडे यांनी सांगितले. त्यामुळे दुचाकीधारकांना आताच हेल्मेटची सोय लावावी लागणार आहे, अन्यथा कारवायांना सामोरे जावे लागेल. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हेल्मेटसक्ती आहे. त्या शहरांमध्ये त्याचे पालनही होते. मात्र, यापूर्वी जिल्ह्यात हेल्मेटसक्तीचे प्रयोग झाले.

योग्य मानकांचे हेल्मेट परिधान करावे
दुचाकीवर प्रवास करताना मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १२९ प्रमाणे दुचाकीधारकांनी योग्य मानकांचे हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ पासून विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येणार आहे. वेळोवेळी जनजागृती आणि विशेष तपासणी मोहीम राबवून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येते.

मोहीम सुरु झाल्यानंतर दुचाकीधारकांकडून हेल्मेटसाठी प्रतिसाद मिळतो, परंतु त्यानंतर पुन्हा दुचाकीधारक विना हेल्मेट दुचाकीवर प्रवास करतात. एखाद्या वेळेस अपघात झाल्यास डोक्याला दुखापत होऊन मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. त्याअनुषंगाने ही हेल्मेटसक्तीची मोहीम राबवण्यात येईल,अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...