आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:बिल्किस बानो खटला; वंचित बहुजन‎ आघाडीकडून दाेषींच्या सुटकेचा विराेध‎

अकाेला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील बिल्किस बानो ‎खटल्यातील दोषींची सुटका‎ करण्याच्या निर्णयाचे संतप्त पडसाद ‎ उमटणे सुरूच आहे. या निर्णयाला ‎वंचित बहुजन आघाडीच्या महिला ‎आघाडीने विराेध करीत स्वाक्षरी‎ अभियान राबवले. याबाबत‎ सरन्यायाधिशांना १३५० स्वाक्षरीचे‎ निवेदनच पाठवले आहे. २००२ च्या‎ गुजरात दंगली दरम्यान बिल्किसवर‎ सामूहिक अत्याचार केला . त्यांच्या‎ ३ वर्षांच्या मुलीसह ७ जणांची हत्या‎ केली होती. मात्र गुजरात सरकारने‎ जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या‎ आरोपींची १५ ऑगस्टला सुटका‎ केली होती.

दरम्यान आराेपींच्या‎ सुटकेच्या निर्णयाविराेधात वंचित‎ बहुजन आघाडीच्या महिला‎ आघाडीने स्वाक्षरी अभियान राबव‎ ले. यात आघाडीच्या महासचवि‎ अरूंधती सिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष‎ प्रतिभा अवचार,शहर अध्यक्ष वंदना‎ वासनिक,शहर महासचवि प्रा.‎ मंतोष मोहोड, संघटक संगीता‎ खंडारे,मंदा सिरसाट, कल्पना‎ महल्ले,सरोज वाकोडे,लीला‎ सहस्रबुद्धे आदी सहभागी झाल्या.‎ ‎ बिल्कीस बानो प्रकरणातील‎ आरोपींना सोडल्या विरोधात वंचित‎ बहुजन महिला आघाडीच्या‎ महानगर शाखेतर्फे स्वाक्षरी‎ अभियान राबविण्यात आले. हे‎ प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात‎ चालविण्यात यावे व बिल्कीस बानो‎ यांना न्याय देण्यात यावा, ही मागणी‎ करण्यात आली.‎ खटल्यातील दाेषींच्या सुटकेचा‎ निर्णय लज्जास्पद असल्याची टी‎ का वंचित बहुजन आघाडीने केली‎ आहे. सरकार एकिकडे बेटी‎ पढाव-बेटी बचावचा नारा देते आिण‎ दुसरीकडे महिलेवर अत्याचार‎ करणाऱ्यांना सन्मानित करते. हे‎ धाेरण मानवी तत्वांच्या विराेधात‎ असून, यामुळे अत्याचार‎ करणाऱ्यांची हिंम्मत वाढणार नाही‎ काय, असाही सवाल वंचितच्या‎ महिला नेत्यांनी केला आहे.‎

न्यायपालिका व सरकारकडून‎ न्यायाची अपेक्षा असल्याचे वंचित‎ बहुजन आघाडीच्या महिला‎ आघाडीने नविेदनात म्हटले आहे.‎ बिल्किस बानाेंना न्याय न‎ िमळाल्यास देशातील अन्य मुलीही‎ नराधमाच्या अत्याचाराच्या पिडीत‎ हाेऊ शकतात, अशी भिती‎ निवेदनात व्यक्त करण्यात आली‎ आहे. त्यामुळे जनतेचा न्याय‎ व्यवस्थेवरील विश्वास आणखी दृढ‎ व्हावा, यासाठी याप्रकरणी याेग्य‎ न्याय करण्यात यावा, असेही‎ निवेदनत नमूद केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...