आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैविक कचरा:घंटागाडीमध्ये टाकला जैविक कचरा

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉस्पीटलमध्ये निर्माण होणारा जैविक कचरा (बायो मेडीकल वेस्ट) नियमित घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या कचरा घंटागाडीमध्ये टाकता येत नाही. शहरातील जठारपेठ चौकातील एका हाॅस्पीटलने जैविक कचरा कचरा घंटा गाडीत टाकल्याप्रकरणी संबंधित हॉस्पीटलला महापालिकेच्या स्वच्छता विभागाने एक लाख रुपयांचा दंड आकारला आहे. दरम्यान हा दंड न भरल्यास हॉस्पीटल सील करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शहरातील हॉस्पीटल, दवाखान्यात निर्माण होणारा जैविक कचरा संकलनाचे काम मे. ग्लोबल इको सेव्ह सिस्टम या संस्थेला देण्यात आले आहे. जैविक कचरा कचरा घंटा गाडीत न टाकता हा कचरा जैविक कचरा संकलन करणाऱ्या गाडीतच टाकावा लागतो. मात्र जैविक कचरा घनकचरा संकलन करणाऱ्या वाहनात टाकल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ तसेच जैविक घनकचरा अधिनियम २०१६ चे उल्लंघन झाले. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागाने संबंधित हॉस्पीटलला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई महापालिकेच्या पूर्व झोनचे अधिकारी विजय पारतवार आणि स्वच्छता विभागाचे प्रमुख प्रशांत राजुरकर यांनी केली.

दरम्यान अद्याप या हॉस्पीटलने एक लाख रुपयांचा दंड महापालिकेकडे भरलेला नाही. आयुक्त कविता द्विवेदी बुधवारी याबाबत संबंधित हॉस्पीटलच्या संचालकांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आयुक्त दंड कमी करतात की दंड न भरल्यास सील लावणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...