आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोल्यातील पक्षीमित्रांच्या वतीने नवर्षाच्या पहिल्या रविवारी पक्षीकट्टा या पक्षीनिरिक्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आखतवाडा तलाव येथे कझाकिस्तान, उत्तर आफ्रिका व तुर्की या देशात आढळणारा डेमोसियल क्रेन या पक्षासोबत विविध 43 पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.
अकोल्या जिल्हातील पक्षीमित्रांची नियमित भेट व्हावी व त्यामधून पक्षी व पर्यायाने निसर्ग संवर्धनाचे कार्य व्हावे यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी पक्षीकट्टा या उपक्रमाचे आयोजन निसर्गकट्टा व महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आखतवाडा तलाव येथे करण्यात आले होते. येथे पक्षीमित्रांना डमोसियल क्रेन या पक्षाचे दर्शन झाले.
या पक्षीकट्टावर संदिप सरडे, डॉ. संतोष सुरडकर, मनोज लेखनार व महाराष्ट्र पक्षीमित्रचे विदर्भ समन्वयक अमोल सावंत उपस्थित होते. पक्षीनिरीक्षणाच्या या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना अमोल सावंत यांनी सांगितले की, पक्षीमित्रांनी एकत्र येऊन पक्षी संवर्धनासाठी कार्य करावे. तसेच नवीन पिढीला पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महिन्यातील पहिल्या व चौथ्या रविवारी या पक्षीकट्टाचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्या रविवारी आखतवाडा येथे पक्षीकट्टा पार पडला. यादरम्यान विविध स्थलांतरीत पक्ष्यांचे दर्शन झाले.
या पक्ष्यांच्याही नोंदी
पहिल्या पक्षीकट्टावर रविवारी, 1 जानेवारी 2023 रोजी आखतवाडा तलाव परिसरात कझाकिस्तान, उत्तर आफ्रिका व तुर्की या देशात आढळणारा डेमोसियल क्रेन तसेच पेन्टेड स्टॉर्क, ओपनबील स्टॉर्क, वुलीनेक स्टॉर्क, ब्रम्हा डक या पक्ष्यांसोबत विविध 43 पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्या नोंदी आंतरराष्ट्रीय ई-बर्ड या अॅपवर नोंदविण्यात आल्या आहेत.
वनस्पतींच्या नोंदी
या कार्यक्रमादरम्यान परिसरातील विविध वनस्पतींच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कोणते वृक्ष लावणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनास माहिती देण्यात येईल असेही पक्षीमित्रांनी सांगितले.
उत्तम प्रतिसाद
आखतवाडा तलाव येथे झालेल्या पहिल्या पक्षीकट्टावर विविध 43 पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला. दर महिन्यातील पहिल्या आणि चवथ्या रविवारी पक्षीकट्टा होणार आहे.
- अमोल सावंत, पक्षीमित्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.