आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आगामी प्रत्येक नविडणुकीत भाजप यश प्राप्त करेल,’ असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केला. भाजप कार्यालयासमोर राज्यसभेचे उमेदवार, केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांच्या नेत्रदीपक विजयाचा जल्लोष करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. आजारी असताना सुद्धा भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी रुग्णवाहिकेतून उमेदवारांना विजयासाठी मतदान केले. भारतीय जनता पक्षावर अनेक आरोप करणारे राजकारणात नवीन माणसे स्वतःला हुशार समजून खालच्या स्तरावर टीकाटीप्पणी करत होते. त्यांची जागा मतदारांनी त्यांना दाखवून दिली. प्रत्येक बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यावर द्वेष बुद्धीने टीका करून आपण वेगळे असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्त्वांना मतदारांनी आरसा दाखवला. असे शर्मा म्हणाले. खासदार संजय धोत्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात आळसी संकुल समोरील भाजप कार्यालयाजवळ फटाक्यांची आतषबाजी करून राज्यसभा नविडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.