आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांनी नोंदणी करुनही त्यांचा बारदाना अभावी खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली. शेतकऱ्यांची बाजू घेत भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. शेतकऱ्यांचा माल का विकाला जात नाही असा सवाल करत रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले आहे.
अधिकारी आणि प्रशासन यांची बैठक करून ताबडतोब निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा व प्रशासनाने नाफेड अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात असे निर्देश आमदार सावरकर यांनी दिले.
13 केंद्रांवर नाफेडच्या हरभराची सुरु आहे प्रक्रिया
जिल्ह्यात 13 केंद्रांवर नाफेडच्या हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. नाफेडकडून बंद केलेल्या हरभरा खरेदीला अखेर मंगळवारी सुरूवात करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य को. ऑपरेेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे खरेदीची प्रक्रिया राबवण्यात आली. शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत विक्रीसाठी नाेंदणीही केली.
मात्र, हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करत नाफेडमार्फत सुरू असलेली हरभरा खरेदी मुदतीपूर्वी 23 मे रोजीच पूर्वसूचना न देता बंद केली हाेती. 5230 रुपये हमीभाव असताना शेतकऱ्यांना खासगी बाजारात हमी भावापेक्षा 800 ते 1000 रुपयांनी कमी भावात विक्री करावी लागली.
जिल्ह्यात 13 केंद्रांवर आहे नोंदणी
जिल्ह्यात 13 केंद्रांवर नोंदणी केलेल्यांपैकी 5,129 शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएसच गेले नसल्याने ते खरेदीपासून वंचित आहेत. दरम्यान केंद्र शासनाच्या पत्राचा संदर्भ देत सहकार, विभागाने हमी भावाने हरभरा खरेदी प्रक्रियेला 18 जूनपर्यंत मुदत वाढ देण्याचा शासनादेश जारी केला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी तसेच शंकरराव वाकोडे, अनिल गावंडे, माधव मानकर, अंबादास उबाळे, राजेश बेले, जयंत मसने, प्रवीण हगवणे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.