आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:महापालिका आयुक्तांसमोर भाजप आमदारांनी उघडला समस्यांचा पेटारा; दूषित पाणीपुरवठ्याबाबत केली चर्चा

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दविसांपासून अकोलेकरांना मुलभूत सोयीसुविधा मिळत नाही, प्यायला दूषित पाणी आणि पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने सोयीसुविधांच्या बाबतीत पुरता बोजवारा उडाला आहे. नागरिक त्रस्त झाले असताना मंगळवारी भाजपच्या तनि्ही आमदारांनी महापालिकेत धडक दिली व आयुक्तांसमोर समस्यांचा भडीमार केला. आयुक्तांनी त्यांचे एकूण घेत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावे, एलईडी लाईट, रस्त्यांची कामे, मोर्णा नदी प्रकल्प, मनपाच्या कार्यालयाची प्रस्तावित इमारती , कॅनाल रोड अतिक्रमण भाजी बाजार, उड्डाणपूल, शवरि ते रिधोरा रस्त्यावरील एलईडी लाईट, वान प्रकल्प पाणी आरक्षण, सिंगल मार्केट ववििध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मागणीनुसार मंगळवारी मनपा कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, जयंत मसने यांच्या उपस्थितीत आयुक्त कविता द्वविेदी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत भाजपा लोकप्रतनििधी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून विकास कामांना गती देण्याचे नरि्देश दिले.

या वेळी अकोला शहरातील पाणीटाकी वरून होणारा पुरवठा, महान धरणावरील पाण्याची परिस्थिती, लिकेज तसेच वितरण व्यवस्था व दूषित पाणी संदर्भात योग्य नियोजन करण्याचे सांगितले. आठ दविसात या संदर्भात योग्य तो नियोजन करण्यात यावे, अशा सूचनांही आमदारांनी केल्या. शहरातील मोठे रस्ते यातील नवििदा पूर्ण करून कामे शीघ्रगती करावे, मोर्णा नदी प्रकल्पासंदर्भात राज्य शासनाकडे व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे सुद्धा या वेळी नरि्देश लोकप्रतनििधींनी दिले. उड्डाणपूल येथील पथदविे सिंगल व्यवस्था करण्यासंदर्भात संदर्भात कामाची माहिती या वेळी बैठकीत घेण्यात आली.

या वेळी महापालिका आयुक्त कविता द्वविेदी यांनी शहरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असून, लोकप्रतनििधी यांच्या सूचनेचा आदर करून जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली. बैठकीला वजिय अग्रवाल, पूनम कळंबे, श्रीकांत पेठकर, संदीप गावंडे, दिलीप जाधव, अनिल बिडवे, अजय गुजर, वजिय पारवार, हरिदास ताटे, अमोल डोईफोडे, सागर शेगोकार यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...