आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाने राजकार:पैशाने राजकारणही विकत घेण्याचा धंदा भाजपने सुरू केला ः खा.राऊत

अकाेला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रामध्ये सुरू असलेले घाणेरडे राजकारण, अन् खऱ्या अर्थाने पैशाने राजकारणही विकत घ्यायचं, हा धंदा भारतीय जनता पक्षाने सुरू केला, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली. मंगळवारी रात्र

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा त्यांच्या बुडाखाली काय जळते ते बघावे उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबतही युती करु शकतात, बावनकुळे यांच्या या व्यक्तव्यावर राऊत म्हणाले की, कदाचित बावनकुळेंची स्मरणशक्ती वयाेमानाप्रमाणे कमी झाली असणार. या भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी ज्या पक्षाच्या आश्रयाने काश्मिरी पंडितांची हत्या झाली. काश्मिरी पंडित यांची घरे उद्ध्वस्त झाली, बेचिराख झाली त्या मेहबूबा मुफ्ती यांच्या पक्षाबरोबर राजकारणासाठी युती केली. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे तसेच बावनकुळे यांचे हिंदुत्व कुठे गेले होते. त्यामुळे आम्हाला त्यांनी शहाणपणा शिकवण्यापेक्षा त्यांच्या बुडाखाली काय जळते ते बघावे, असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...