आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातही भाजपचे कार्यकर्ते आक्रमक:बिलावल भुट्टोच्या पुतळ्याचे दहन; 'मविआ' विरोधातही आंदोलन

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान विदेश मंत्र्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणीचा भाजपकडून शनिवारी निषेध व्यक्त करीत माफी मांगाे आंदाेलन करण्यात आले. तसेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही देवी-देवता महापुरुषांचा अपमान हाेत असून, हे सहन केले जाणार नाही, असा इशारा भाजपने दिला.

पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी पत्रकार परिषदेत खालच्या पातळीवर टीका केली हाेती. या विरोधात भाजपने विविध जिल्ह्यात आंदोलन केले. या टीकेचा नागरिकांनी निषेध व्यक्त करण्यात आला. अशी प्रवृत्ती भारतीय सहन करणार नाही असा इशारा भाजप नेत्यांनी दिला. यासाठी जिल्ह्यात 25 ठिकाणी पाकिस्तनच्या विदेश मंत्र्यांचा निषेध करण्यात आला. तसेच शिसनेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खा. संजय राऊत, सुषमा अंधारे व काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर माफी मागावी, यासाठी माफी मागून आंदोलन करण्यात आले.

आंदाेलनात प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, अर्चना मसने, तेजराव थोरात किशोर पाटील, सतिष ढगे, गजानन उंबरकर, अंबादास उमाळे ,अनुप धोत्रे महेंद्र गोयंका , कनक कोटक, अशोक गावंडे,गिरीश जाेशी, अक्षय जाेशी, अमोल साबळे, महेंद्र पेजावार, रमण जैन, धनंजय धबाले, राहुल देशमुख, अभिजीत गहलोत ,भूषण कोकाटे , श्रावण इंगळे बळीराम सिरस्कार, चंद्रशेखर पांडे, शिवाजीराव देशमुख ,प्रभाकरराव मानकरए, माधव मानकर सहभागी झाले.

असे झाले आंदाेलन

भाजप कार्यालयातून नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाकिस्ताच्या विदेश मंत्र्यांविराेधात घाेषणा देत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, फुले नाट्यगृहासमोर धाव घेतली. याठिकाणी प्रतिकात्मक पुतळा व झेंड्याचे दहन करीत भाजपने आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आंतकियाे से जिसकी बारी है वाे बिलाबल भुट्टो जरदारी है, असे फलक घेऊन भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले हाेते.

वाहतुकीची कोंडी

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर फुले नाट्यगृहासमोरच भाजप कार्यकर्त्यांनी आंदाेलन केल्याने काही वेळ गांधी राेड, फतेह अली चाैकाकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरू हाेती. अनेक वाहनचालकांनी अमृतवाडी मार्गाने जाणे संपत केले. आंदाेलनात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदाेबस्तही तैनात करण्यात आला हाेता.

बातम्या आणखी आहेत...