आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन‎:शिवसेनेच्या मतदारसंघातील विकासकामांना‎ भाजपचा विराेध; आमदार देशमुख यांची टीका‎

अकाेला‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भाजपचा केवळ शिवसेनेच्या‎ मतदाससंघातील िवकासकामांना‎ िवराेध असून, ६० टक्के काम झालेल्या‎ ६९ गावे पाणीपुरवठा याेजनेला स्थगिती‎ देत पालकमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण‎ केले,’ अशी टीका शिवसेनेचे (उद्धव‎ ठाकरे) आमदार िनतीन देशमुख यांनी‎ रविवारी पत्रकार परिषदेत केली.‎ राजकरण करून जनतेला‎ पाण्यापासून वंचित ठेवण्याच्या‎ िनषेधार्थ मंगळवारी विधिमंडळाच्या‎ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज‎ यांच्या पुतळ्यासमाेर आपणउपाेषण‎ करणार असून, अकाेल्यात‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ५‎ हजार ग्रामस्थ आंदाेलन करतील,‎ असा इशारा त्यांनी दिला.

बाळापूर‎ व अकाेला तालुक्यातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ खारपाणपट्ट्यातील गावांसाठी वरदान‎ ठरणाऱ्या व शिवसेना (उद्धव ठाकरे)‎ आग्रही असलेल्या ६९ गावे प्रादेशिक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पाणीपुरवठा याेजनेला शिंदे-‎ फडणवीस सरकारकडून स्थगिती‎ देण्यात आली आहे. या याेजनेला वान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रकल्पातून पाणीपुरवठा हाेणार असून,‎ पाणी देण्याला तेल्हारा तालुक्यातील‎ काही ग्रामस्थांनी िवराेध केला आहे. दरम्यान‎ बाळापूरचे आमदार देशमुख यांनी‎ रविवारी १२ मार्चला पत्रकार परिषदेत‎ भाजपवर िनशाणा साधला. वानमधून‎ शेगाव, जळगाव जामाेद येथेही‎ पाणीपुरवठा हाेताे.

मात्र त्या िठकाणी‎ भाजपचे आमदार असून, बाळापूर येथे‎ शिवसेनेचे आमदार असल्यानेच‎ भाजपचे आमदार िवराेध करीत आहेत.‎ पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस‎ यांनी पाणीटंचाई िनवारण्यासाठी बैठक‎ घेणे आवश्यक हाेते. मात्र हे न करता‎ त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारने मंजूर‎ केलेल्या पाणीपुरवठा याेजनेलाच‎ स्थगिती देत ग्रामस्थांना तहानलेले‎ ठेवले आहे. स्वत:ला िहंदुत्ववादी‎ म्हणून घेणाऱ्या शिंदे-फडणवीस‎ सरकराला ग्रामस्थ हे िहंदू दिसत नाहीत‎ काय, असा सवाल त्यांनी केला.‎ पत्रकार परिषेदला माजी आमदार‎ गजानन दाळू गुरुजी, सहसंपर्क प्रमुख‎ सेवकराम ताथाेड, जिल्हाप्रमुख गाेपाल‎ दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल‎ पवनीकर, पूर्वचे अध्यक्ष राहुल कराळे,‎ पश्चिमचे प्रमुख राजेश िमश्रा, विकास‎ पागृत, उमेश जाधव आदी उपस्थित‎ हाेते.‎

न्यायप्रविष्ट असतानाही स्थगिती :‎ ६० गावे पाणीपुरवठा याेजनचे प्रकरण‎ न्यायप्रविष्ट असतानाही सरकारने‎ स्थगिती िदली. याेजनेची किंमत २१९‎ काेटी रुपये असून, प्रत्यक्ष याेजनेवर‎ १९२ काेटी रुपये खर्च हाेणार आहेत.‎

त्यापैकी १०८ काेटी रुपये खर्च झाले‎ असून, कंत्राटदाराला ९२ काेटीचे‎ देयकही अदा करण्यात आले आहे,‎ असे असनाताही उपमुख्यमंत्री‎ फडणवीस यांनी याेजनेला स्थगिती देत‎ स्वत:ची बाैद्धिक दिवाळखाेरीच जाहीर‎ केली, अशी टीका आमदार देशमुख‎ यांनी केली.‎ ...तर सरकारने दखल घ्यावी‎ प्रत्यक्ष वान प्रकल्पासाठी तेल्हारा‎ तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन‎ अधिगृहित झालेली नाही, असे‎ आमदार देशमुख म्हणाले. मात्र‎ शेतकऱ्यांच्या नावाखाली चार-पाच‎ भाजप कार्यकर्त्यांनी पाणी आरक्षणाला‎ िवराेध केला आणि अकाेटचे भाजप‎ आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्र‎ दिल्याने याेजनेला स्थगिती देण्यात‎ आली. आता मंगळवारी शेकडाे‎ ग्रामस्थांकडून हाेणाऱ्या आंदाेलनाची‎ पाण्यावरूनही राजकारण करणारे‎ शिंदे-फडणवीस सरकार दखल घेईल‎ काय, असा सवाल आमदार देशमुख‎ यांनी केला.‎

असे आहे आरक्षण : पाणीपुरवठा‎ हाेणाऱ्या वान प्रकल्पाची माहिती‎ पुढीलप्रमाणे आहे. सिंचनासाठी‎ ७८.५७३ दलघमी पाणी आहे.‎ पिण्यासाठी १.४०४ तर बाप्पीभवन‎ म्हणून ४.४५७० दलघमी पाणी जाते.‎ अकाेट शहर पाणीपुरवठा याेजना‎ : ८.६६ दलघमी तेल्हारा शहर‎ पाणीपुरवठा याेजना : ३.१६ दलघमी‎ जळगाव जामाेद पाणीपुरवठा‎ याेजना : ४.०२ दलघमी ८४ खेडी‎ पाणीपुरवठा याेजना : ४.२३९‎ दलघमी शेगाव शहर पाणीपुरवठा‎ याेजना : ५.६२ दलघमी १४० गावे‎ जळगाव जामाेद पाणीपुरवठा‎ याेजना : ८.४५४ दलघमी‎ तेल्हारा-अकाेट १५९ पाणीपुरवठा‎ याेजना (प्रस्तावित): ३.७५३‎ दलघमी ८)अकाेला शहर अमृत‎ पाणीपुरवठा याेजना (सध्या‎ स्थगिती): २४ दलघमी ९)‎ बाळापूर-अकाेला ६९ गावे पाणीपुरवठा‎ याेजना : ३.३५ दघलमी १०) शेगाव ३०‎ गावे पाणीपुरवठा याेजना (प्रस्तावित):‎ ४.७३३ दलघमी‎

आगामी काळात शिवसेना यावरही आंदाेलन करेल‎‎
वान धरणातून महापालिकेच्या पाणीपुरवठा याेजनेसाठीही पाणी आरक्षित‎ केले हाेते. त्यामुळे आगामी काळात शिवसेना यावरही आंदाेलन करेल, असा‎ इशारा आमदार देशमुख यांनी दिला.‎

भाजपचा पलटवार‎
भाजपवर आरोप करण्यापेक्षा‎ आमदार नितीन देशमुख यांनी‎ आत्मचिंतन करावे, अकोल्याला‎ पाणीपुरवठा करण्यासाठी विरोध‎ करणारे कोण होते, याचा शाेध‎ त्यांनी घ्यावा, असा पलटवार‎ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तेजराव‎ थाेरात यांनी केला आहे. त्याच्या‎ तांत्रिक अडचणीची माहिती त्यांनी‎ जनतेला द्यावी. केवळ खोट्या‎ प्रसिद्धीसाठी आराेप करू नये.‎ शहरातील निधी कसा पळवला‎ होता, हेही त्यांनी सांगावे, असेही‎ थाेरात यांचे म्हणणे आहे.‎

बातम्या आणखी आहेत...