आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:महानगरात विकास कामासाठी भाजपचे केंद्र सरकारला साकडे; केंद्रीय मार्ग निधीतून कामांचे प्रस्ताव

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरातील रस्त्यांच्या कामासाठी भाजप आमदारांनी थेट केंद्र सरकारला साकडे घातले आहे. कामांचे प्रस्ताव केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) मधून मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोणता नरि्णय घेतात याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शविसेनेच्या महाविकास आघाडीकडून शहरासाठी निधी कमी प्रमाणात मिळत असल्याचा आरोप वरिोधकांकडून करण्यात येत आहे. सन २०१४ ते २०१९ या कालावधीत महापालिका ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती. रस्त्यांसाठी निधीही प्रचंड ओतण्यात आला. उड्डाणपूलांचाही कामे सुरू झाली. मात्र रस्त्यांच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला. त्यामुळे दाेन वर्षात ठिकठिकाणी खड्डे पडले.

दरम्यान २०२०मध्ये राज्यात सत्ता बदल झाला आिण भाजपवर वरिोधी बाकावर बसण्याची वेळ आली. विशेषतः रस्ते विकासाबाबत विदर्भातील सर्वात मागसलेली महानगरपालिका अकोला आहे. अशातच महाविकास आघाडीकडून भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात निधी ओतताना हात आखडता घेतला आहे. मनपाच्या निधीतून रस्ते विकास करणे शक्य नसून, ही बाब लक्षात घेता भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांनी केंद्रीय मार्ग निधीतून अकोला शहरासाठी कामे प्रस्तावित केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रस्ताव पाठवला आहे.

या कामांचा केला उल्लेख
केंद्रीय मार्ग निधीतून पुढील दाेन कामांचा उल्लेख प्रस्तावात केला आहे.
१) विधानसभेच्या अकोला पश्चमि मतदारसंघातील मोर्णा नदीवरील जुना हिंगणा गाव ते गणेश घाट हिंगणा रोड येथे पूल बांधकामासाठी ३५ कोटींचा निधी.
२) जुने शहरातील असदगढ किल्ला ते बाळापूर नाक्यापर्यंतच्या रस्ता बांधकामा साठी २५ कोटीचा निधी प्रस्तावित केला.

प्रस्ताव मंजूर होईल
हिंगणा रोडवरील मोर्णा नदीवरील पूल आणि बाळापूर नाक्यापर्यंतचा रस्त्याच्या काम होणे आवश्यक आहे. या दाेन्ही कामांबाबत प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. शहरासाठी कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच ही निधी मंजूर होईल, असा विश्वास आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...