आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य अभ्यास मंडळ

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री शिवाजी महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत वाणिज्य मंडळाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अंबादास कुलट होते, तर उद्घाटक म्हणून एलआरटी महाविद्यालयाच्या डॉ. वर्षा सुखदेवे होत्या.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रूपा गुप्ता, राधादेवी गोयनका महाविद्यालय अकोला, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अनिल राऊत, वाणिज्य मंडळ समन्वयक डॉ. संजय तिडके, वाणिज्य मंडळ माजी अध्यक्ष रोहन बुंदेले, वाणिज्य मंडळाचे अध्यक्ष किर्तेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सुखदेवे यांनी वाणिज्य मंडळाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास कसा घडतो, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. रूपा गुप्ता यांनी संगणक विषयाचे कॉमर्समधील महत्त्व सांगितले. रोहन बुंदेले यांनी वाणिज्यमधून व्यक्तिमत्व विकास, सकारात्मकता, आत्मविश्वास कसा बळकट करता येतो यावर माहिती दिली. डॉ. राऊत यांनी वाणिज्य विभागाबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविकात समन्वयक डॉ. संजय तिडके यांनी वाणिज्य मंडळाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुलट यांनी मंडळांतर्गत विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन सारिका निचत व नीतू साह यांनी केले, तर आभार मोहंमद कैफ यांनी मानले. प्रा. डॉ. गणेश खेकाळे, प्रा. संगीता शेगोकार, प्रा. सविता निचित, प्रा. पवार, प्रा. विशाल भोजने आदींची या वेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...