आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआतापर्यंत राज्यात पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ 7.92 टक्के जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. राज्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणातील बूस्टर ड़ोसच्या मोहिमेत मुंबई आणि पुणे हे दोन जिल्हे आघाडीवर आहेत. सर्वाधिक 12.15 टक्के लसीकरण मुंबईमध्ये तर, 10.10 टक्के लसीकरण पुणे जिल्ह्यात झाले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 18 ते 59 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी 15 जुलै ते 30 सप्टेंबरदरम्यान शासकीय लसीकरण केंद्रावरून मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. मात्र, अजूनही बहुतांश लोकसंख्येचा बूस्टर डोस बाकी आहे.
राज्यातील स्थिती
बूस्टर डोससाठी पात्र लाभार्थी : 7 कोटी 56 लाख 600
लस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या : 59 लाख 91 हजार 184
उद्दिष्टांपैकी राज्याची टक्केवारी : 7.92 %
बूस्टर डोसमध्ये सध्याचे टॉप-10 जिल्हे
मुंबई : 12.15 %
पुणे : 10.10 %
सातारा : 9.43 %
ठाणे : 9.37 %
नागपूर : 9.31 %
पालघर : 9.06 %
रत्नागिरी : 8.56 %
जळगाव : 8.49 %
रायगड : 8.46 %
धुळे : 8.24 %
हे जिल्हे शेवटच्या स्थानी
बुस्टर डोसमध्ये नांदेड जिल्हा शेवटच्या म्हणजे 35 व्या स्थानी आहे. त्यापूर्वी बुलडाणा, गडचिरोली, यवतमाळ, जालना, परभणी, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांचे स्थान आहे. वाशिम वगळता इतर जिल्ह्यातील बूस्टर डोसचे लसीकरण 5 टक्क्यांच्या आत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.