आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटवर सट्टा:बोरगाव मंजूत पोलिसांचा छापा; दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल, 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा जोरात असून, सामन्यावर सट्टा लावण्यास सुरू असतानाच पोलिसांच्या विशेष पथकाने बोरगाव मंजू परिसरात छापा टाकला. पोलिसांनी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटकही केली. छाप्यात पोलिसांनी १ लाख १० हजारांचा मुद्देमालही जप्त केला.

आयपीएलवरील क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला शनिवारी रात्री मिळाली हाेती. पोलिसांनी बोरगाव मंजू येथील रेणुका नगर परिसरात धाव घेतली. येथे विरू उर्फ विरेंद्र राधेश्याम अग्रवाल याच्या घरात त्याचा नोकर गौरव सुभाष पवार (वय ३०, रा. रेणुकानगर बोरगाव मंजू) हा इंडियन प्रिमियर लीग टी-२० सामन्यातील मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थआन रॉयल संघातील सामन्यावर खायवाडी करताना आढळला.

बातम्या आणखी आहेत...