आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा4 हजार रुपयांचे सोयाबीन विकत घेऊन पुन्हा शेतकऱ्यांच्या माथी मारले, असे म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ऐन पेरणीच्या तोंडावर महाबीजची पोलखोल केली. दोन वर्षांपूर्वी महाबीज जवळील सोयाबीनचे बियाणे संपले, तेव्हा त्यांनी चक्क बाजार समितीतून बियाणे विकत घेतले. त्याची केवळ चाळणी केली. महाबीजच्या पिशव्यांमध्ये पॅकींग करून शेतकऱ्यांना विकले, असा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे महाबीजच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहे.
नेमके प्रकरण काय?
बच्चू कडू म्हणाले की, आपल्याजवळ एका महाबीजच्या अधिकाऱ्याने हे कबूल केले की, महाबीज कंपनीजवळचे सोयाबीनचे बियाणे संपले तेव्हा ते कृषी उत्पन्न बाजार समितीत गेले. त्यांनी सरळ हरासीमधून सोयाबीन विकत घेतले आणि त्या सोयाबीनला चाळणी मारली. कंपनीच्या पाकीटमध्ये तेच बियाणे भरून शेतकऱ्यांना विकले. म्हणजेच शेतकऱ्यांजवळचे सोयाबीन चार हजार रुपये भावाने मार्केटमधून विकत घेतले. ते फक्त ते फक्त पॉकेटमध्ये टाकले. अन पुन्हा शेतकऱ्यांच्या माथी मारले.
आम्हाला येडे बनवले
बच्चू कडू म्हणाले की, कंपनीवाले अशा पद्धतीने सोयाबीन पाकीटमध्ये विकत असतील आणि आम्हाला येडे बनवत असतील, तर मग आमचा शेतकरीच आता बियाणे तयार करून पेरत असेल, तर त्याला वाव देणे गरजेचे आहे. अकोल्यामध्ये बियाणे महोत्सवाचा देशातील पहिला प्रयोग 1 जूनपासून राबवण्यात येत आहे. 6 जूनपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केला आहे. आज जरी बियाणे महोत्सवाला कमी प्रतिसाद मिळत असला, तरी येत्या काळात याशिवाय पर्याय नाही.
जाणीवपूर्वक तुटवडा
जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करून भाव वाढवणे, महाबीजचे बियाणे बोगस निघाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत पोलिसात देखील तक्रारी केल्या आहेत. महाबीज ही सरकारी बियाणे कंपनी असून तिचे मुख्यालय अकोला येथे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.