आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न आराेग्याचा:जीएमसी तील निवासी डॉक्टरांचा ओपीडीतील रुग्णसेवेवर बहिष्कार

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटनेने ‘(मार्ड) सोमवार २ जानेवारीपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील ५० निवासी डॉक्टर्स सहभागी झाले आहेत. या डॉक्टरांनी बाह्य रुग्ण विभाग आणि नॉन इमरजेंसी रुग्णसेवेवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागात रुग्णसेवेस विलंब लागला.

गेल्या काही वर्षांपासून संघटनेने विविध स्तरावर महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या समस्या मांडून शासन व प्रशासनास माहिती करून देण्याचा प्रयत्न केला. राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण मंत्री, संबंधित विभागाचे सचिव, आयुक्त व संचालकांसोबत संघटनेच्या अनेक बैठकाही झाल्या मात्र मागण्यांबाबत कोणताही विचार न झाल्याने ‘मार्ड’ने संपाला सुरुवात केली आहे. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५० निवासी डॉक्टरांनी या संपाला पाठींबा देत सोमवारी अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर

या आहेत प्रलंबित मागण्या
अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांची हेळसांड हाेत आहे.
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे रखडला आहे.
सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची अपुरी पदे तातडीने भरा.
१६ ऑक्टोबर २०१८ प्रमाणे लागू झालेल्या तारखेपासून महागाई भत्ता तत्काळ अदा करा.
राज्यातील वरीष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करा.
सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करा.

रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा सुरू
मार्ड’च्या निवासी डॉक्टरांचा संप असला तरी त्यांच्याकडून अत्यावश्यक रुग्णसेवा देण्यात येत आहे. रुग्णसेवा प्रभावित होऊ नये, याची खबरदारी घेतली आहे. इतर अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थीं (इंटर्न) कडून सेवा देण्यात येत आहे. ‘मार्ड’च्या निवासी डॉक्टरांनी ‘ओपीडी’मध्ये सेवा दिली नाही. - डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

बातम्या आणखी आहेत...