आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्युत साहित्य चोरी करणारी 8 जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. सर्व आरोपी हे कापशी रोड व वरखेड येथील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरी गेलेले विद्युत साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, कापशी येथे राहणारे अजय रामराव तिडके व योगेश नरसिंग डाबेराव यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने पातूर हद्दीत विद्युत तार व इतर साहित्याचे चोऱ्या केल्या आहेत. त्या माहितीवरुन पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या पथकाने अजय रामराव तिडके (वय 21), योगेश नरसिंग डाबेराव (वय 28), स्वप्नील रमेश सुर्वे, सुरज रामपाल केवट, मुकेश उर्फ कालू रामकुमार केवट , पंकज नाजुकराव निखाडे रा. वरखेड, प्रदीप दयाराम निखाडे व गोपाल दिलीप काकड रा. चिखलगाव यांना ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली.
चार गुन्हे दाखल
यावेळी आरोपींनी वीज वितरण कंपनीचे विद्युत तार व इतर साहित्याची विविध ठिकाणाहून चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वीज चोरीचे किती गुन्हे दाखल आहेत याबाबत चौकशी केली असता त्यांना चार गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आरोपीकडून अॅल्युमिनिअम विद्युत तार 58 किलो, चोरीतील माल विकून हिश्यावर आलेले 80 हजार रूपये, गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, असा एकूण दोन लाख 9 हजार 280रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, पीएसआय मुकुंद देशमुख, एएसआय नीतीन ठाकरे, पोहेकॉ. दत्तात्रय ढोरे, विशाल मोरे, रवी पालीवाल, श्रीकांत पातोंड, संदीप ताले, अक्षय बोबडे, नफिस शेख यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.