आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाब:टंचाई आराखड्यात उपाय याेजनांना फाटा‎

अकाेला‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संभाव्य पाणी टंचाई आराखड्यात‎ उपाय याेजनांना फाटा देण्यात‎ आल्याने जिल्हा परिषदेच्या जल ‎व्यवस्थापन समिती सदस्यांनी‎ अभियंते, अधिकाऱ्यांना जाब‎ िवचारला आहे. समितीच्या बैठकीत ‎पदाधिकारी-सदस्यांनी उपाय‎ याेजना काढण्याची सूचना‎ प्रशासनाला दिली आहे.‎ उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही ‎तालुक्यातील ग्रामस्थांना पाणी‎ टंचाईचे चटके साेसावे लागतात.

‎ काही ठिकाणी तर २-३‎ कि.मी.पर्यंतही पायपीट करुन पाणी‎ आणावे लागते. अनेक गावात तर‎ पाणी विकतही घ्यावे लागते. गतवर्षी‎ संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून‎ ग्रामस्थांना दिलावा मिळावा,‎ यासाठी जि. प. तर्फे जिल्हा‎ प्रशासनाला पाणीटंचाई निवारण‎ कृती आराखडा सादर करण्यात‎ ‎येताे.जलव्यवस्थापन समिती सभेत‎ आरा‌‌‌‌‌खड्यावर चर्चा झाली. सभेत‎ अध्यक्षा संगिता आढाऊ, उपाध्यक्ष‎ सुनील फाटकर, समाज कल्याण‎ सभापती आम्रपाली खंडारे, याेगिता‎ राेकडे, रिजवाना परवीन, अतिरिक्त‎ मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष‎ पवार उपस्थित हाेते.‎

यापूर्वीही झाली हाेती चर्चा :‎ पाणी टंचाई कृती आराखड्यावर‎ गतवर्षी झालेल्या जलव्यवस्थापन‎ समितीच्या सभांमध्येही चर्चा झाली‎ हाेती. अनेक गावात पाणी टंचाई‎ असतानाही उपाय याेजना प्रस्तावित‎ करण्यात आल्या नव्हत्या. परिणामी‎ संबंधित गावातील ग्रामस्थांनी जि.प.‎, पं.स. सदस्यांकडे धाव घेतली‎ हाेती. त्यामुळे सदस्यांनी सभेत‎ अधिकारी-अभियंत्यांना जाब‎ िवचारला हाेता. अधिकाऱ्यांनी थेट‎ जिल्हा प्रशासनाकडे बाेट दाखवले‎ हातेते. त्यामुळे आता यंदाच्या पाणी‎ टंचाई आराखड्याकडे सर्वांचे लक्ष‎ लागले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...