आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात स्तनपान सप्ताह:विद्यार्थिनी, परिचारिकांनी रांगोळी स्पर्धेतून केली जनजागृती; पथनाट्यही सादर

अकोला2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे जागतिक स्तनपान सप्ताह विविध स्पर्धांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि परिचारिकांनी पोस्टर्स आणि रांगोळीच्या माध्यमातून स्तनपानासंदर्भात जनजागृती केली. रुग्णालयातील मातांनाही स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. शेवटी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

१ ते ७ ऑगस्टपर्यंत सुरू असलेल्या जागतिक स्तनपान सप्ताह सर्वोपचार रुग्णालयात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त स्तनदा मातांचे स्तनपानाविषयी ज्ञान जाणून घेण्यासाठी स्तनदा मातांसाठी प्रश्नावली, कार्यरत परिचारिका व प्रशिक्षणार्थी परिचारिका यांच्यासाठी प्रश्न मंजुषा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, समयसूचकता स्पर्धा आदी स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. स्तनपान करणे ही केवळ मातेची जबाबदारी नसून कुटुंब व समाज तसेच शासन यांचेही महत्वाचे काम आहे. या अंतर्गत स्तनदा मातांना योग्य शिक्षण, मार्गदर्शन, मदत व आधाराची गरज असते. याबद्दल या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पथनाट्यही सादर करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, बालरोग विभाग प्रमुख डॉ. विनीत वरठे, प्रसूती शास्त्र विभाग प्रमुख अपर्णा वाहने, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य सरिता राठोड, अधीसेविका ग्रेसी मरियान, बालरुग्ण पारिसेविका सुनिता उगले आदींची यावेळी उपस्थित होती. विविध स्पर्धांमधील सहभागी तसेय विजयी स्पर्धकांना बक्षीसे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

महत्त्वपूर्ण मुद्द्यांची मांडणी

स्तनपानाचे मातांना होणारे फायदे तसेच बालकांना होणाऱ्या फायद्याबाबत स्पर्धकांनी आपल्या कलाकृतीतून माहिती दिली. ज्या माता स्तनपान करतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी असते. गर्भधारणेच्या तसेच स्तनपानाच्या काळात स्तनातील पेशीमध्ये बदल होत असतात. या पेशींमधील बदलामुळे स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता फार कमी होते. स्तनपानामुळे आई आणि बाळाचे नाते दृढ होण्यास मदत होते. स्तनपानातून मिळणारे दूध हे अर्भकासाठी सर्वोत्तम पेय आहे. हे दूध म्हणजे जीवनसत्व, प्रथिने, आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी चरबी या सर्व घटकांचा योग्य मिलाप असते. त्यात बरीच प्रतिबंधात्मक द्रव्ये असतात, आदी बाबींची माहिती यावेळी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...