आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारपासून अतिक्रमण हटाव जोरात:सुधीर कॉलनी मार्गावरील रस्त्यालगतच्या दुकानांवर चालला बुलडोझर; 20 लोखंडी टपऱ्या जमीनदोस्त

अकोला2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेच्या पाचव्या दिवशी सुधीर कॉलनी मार्ग ते सिव्हिल लाईन चौक या दरम्यान रस्त्या लगत असलेल्या आणि रहदारीत अडथळा ठरलेल्या लघु व्यावसायीकांच्या दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आला.

अतिक्रमण हटाव मोहिमेत 20 लोखंडी टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. तसेच दोन ट्रॅक्टर साहित्यही जप्त करण्यात आले.

दंडात्मक कारवाई होणार

शहरात महापालिकेच्या वतीने सोमवार पासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम टप्प्या-टप्प्याने शहराच्या सर्वच भागात राबविण्यात येणार आहे. तसेच अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्या नंतर पुन्हा लघु व्यावसायीकांनी दुकाने थाटल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली.

या ठिकाणी सफाया

शुक्रवारी मोहीमेच्या पाचव्या दिवशी सुधीर काॅलनी मार्ग, जवाहर नगर चौक, खेडकर नगर गल्ली, सिव्हिल लाईन रोड, सिव्हिल लाईन चौक या मार्गातील अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. या भागातील पाणी पुरी, भेळपूरी, लॉन्ड्री, पानपट्टी, चहाची टपरी, भाजी विक्रेते आदींची दुकाने जेसीबी मशिनच्या सहाय्याने तोडण्यात आली. तर मोहीम सुरू झाल्याचे पाहून काहींनी आपल्या गाड्या लंपास केल्या. ही मोहीम पूर्व झोनचे झोनल अधिकारी विजय पारतवार, चंद्रशेखर इंगळे, राजेंद्र टापरे, अक्षय बोर्डे, सय्यद रफिक, वैभव कवाडे, रुपेश इंगळे, शोभा इंगळे, कल्पना उप‌र्वट, कविता सगडे आदींनी राबविली.

गाड्या ठेवणे महागात

अतिक्रमण हटाव पथक सिव्हिल लाईन मार्गावर येताच. काही लघु व्यावसायीकांनी आपल्या चारचाकी गाड्या लंपास केल्या. तर काहींनी रोड लगत असलेल्या गल्लीत ठेवल्या. मात्र अतिक्रमण पथकाने गल्लीत जावून या गाड्यांचा चुराडा केला.

नाल्यावरही अतिक्रमण

सुधीर कॉलनी मार्गावर रस्त्याच्या बाजूने असलेल्या सांडपाणी वाहुन नेणारी थेट बुजवुन त्यावर लघु व्यावसायीकांनी आपली दुकाने थाटली होती. या दुकानांच्या खाली नाली आहे, ही बाब ही दुकाने हटविल्या नंतर स्पष्ट झाली. लघु व्यावसायीकानी सांडपाणी वाहुन नेणाऱ्या नाल्यांवर अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...