आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई​​​​​​​:14 घरांमध्ये चोरी; 24 ते 28 वयोगटातील 3 चोरटे गजाआड

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्चभ्रु वस्तीच्या न्यू राधाकिसन प्लॉटमधील चांगल्या घरची २४ ते २८ वयोगटातील तीन युवकांना पोलिसांनी घरफोडीच्या आरोपाखाली अटक केली. त्यांनी एकापाठोपाठ १४ घरे फोडली. लाखोंचा ऐवज लंपास करून ते दोन वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देत होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना पकडले. तिघांनीही १४ घरात चोरी केल्याची कबुली दिली. ७ लाख ३१ हजाराचा मुद्देमालही पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला

जिल्ह्यात दोन वर्षापासून विविध पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आशिष इश्वर लोडाया (वय २५, रा. केतकी अपार्टमेंट, न्यु राधाकिशन प्लॉट, अकोला.), पुर्वेश राजेश शाह (वय २८, रा. फ्लॅट नं. ७, श्रीनाथ अपार्टमेंट, न्यु राधाकिशन प्लॉट, अकोला.) आणि शवमि वरिेंद्र ठाकुर, वय २४, रा. केतकी अपार्टमेंट जवळ, राधाकिशन प्लॉट, अकोला.) या तिघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्यांनी घरफोड़ीची कबुली दिली. त्यांच्याकडून १६३.४ ग्रॅम सोने किं.६ लाख ४६,३७० रूपये, १ किलो ३८० ग्रॅम चांदी किं. ५६,३७० रूपये,२९ हजार असा एकत्र ७ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
एका पोलिसाकडे तर एका माजी सैनिकाच्या घरात चोरी : माजी सैनिक रघुनाथ रामभाऊ मोरे, जि. प. कॉलनी यांच्या घरातून २२ हजार ७०० रुपयांचा चांदीचे दागनिे, चांदीची पाटी, चांदीचा चमचा, तोड्याचा जोड, चांदीची मुर्ती, सोन्याचे एक ग्रॅम ओम चोरट्यांनी मोरे कुटुंबिय लग्नाला गेले असताना १५ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान चोरून नेले होते. {न्यू तापडीया नगरातील पुरुषोत्तम बुंदे २२ एप्रिल रोजी दहा वाजता दवाखान्यात गेले होते. तर पत्नी शाळेत गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास चोरट्यांनी मागील बाजूने घरात प्रवेश करीत २९ हजार रुपयांचे दागनिे व १० हजार चोरून नेले होते.

वृंदावन गार्डनच्या मागे गीता नगर जुने शहर येथील रेल्वे पोलिस पवार यांच्या घरातून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचे दागनिे चोरून नेले होते. पवार कुटुंबासह २३ एप्रिल रोजी मोताळा येथे नातेवाईकाकडे लग्नाला गेले होते.

अकोट फैलातील मोहम्मद ताजउद्दीन मोहम्मद अल्लाउद्दीन यांच्या घरातून चोरट्यांनी ८६ हजार ९०० रुपयांचे दागनिे चोरून नेले होते. १२ जानेवारीच्या रात्री सर्व कुटुंबिय रात्री घरातच असताना चोरट्यांनी चोरी केली होती.

चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफांचे काय? : चोरीचे सोने विकत घेणे हा गुन्हा आहे. ज्या सराफांनी या चोरट्यांकडून चोरीचे सोने विकत घेतले असतील त्यांना अभय आहे का? ते या प्रकरणात आरोपी कसे बनू शकत नाहीत, शेगावची अपवादात्मक कारवाई वगळता अनेक गुन्ह्यात चोरट्यांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेतल्यानंतरही पोलिस चोरीचे सोने विकत घेणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याची चर्चा आहे. जर सराफांकडून सोने जप्त केले असेल तर अशा सराफांना पोलिस समोर का आणत नाहीत, पोलिस त्यांनाही सहआरोपी करतील का, असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

खदान पोलिस ठाणे हद्दीत सर्वाधिक सहा घरे फोडली
खदान पोलिस ठाणे हद्दीत सर्वाधिक सहा घरे या चोरट्यांनी २०२१ ते २०२२ दरम्यान फोडली. त्यानंतर त्यांनी सवि्हिल लाइन्स ठणे हद्दीत दोन, जुने शहर ठाणे हद्दीत दोन, सवि्हिल लाइन्स ठाण्याच्या हद्दीत दोन, पातूर, अकोट फैल, मूर्तजिापूर ठाणे हद्दीत प्रत्येकी एका घरात चोरट्यांनी चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, आणखी काही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...