आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील कुरूम येथे एका घराला अचानक आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले. रात्री १२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार, देविदास किसनराव दुरतकर यांचा परिवार हा मारवाडीपुरा भागात भगवानदास मालाणी यांच्या घरात गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून भाड्याने राहत आहे. ते लोहार काम करतात. तर त्यांच्या पत्नी अंगणवाडी सेविका आहेत. त्यांच्या चौथ्या मुलीचे लग्न ३१ डिसेंबरला ठरलेले आहे. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी आणलेले साहित्य या आगीत जळून खाक झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले. माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत हे सहकाऱ्यांसोबत कुरूम परिसरात गस्तीवर होते. अचानक रात्री १२ च्या सुमारास घराला लागलेली आग पाहून त्यांनी दुरतकर परिवाराला घराबाहेर काढले आणि ताबडतोब अग्निशमन दलास पाचारण केले.
मुलीचे लग्न जुळल्याने दुरतकर परिवाराने हळुहळू लग्नाची तयारी करत वेगवेगळे साहित्य खरेदी करून ठेवले होते. परंतु या आगीत लग्नासाठी खरेदी केलेला पंखा, कुलर, शिलाई मशीन, कटर मशीन, नवीन कपडे, तांदूळ, गहू, गादी, रजई आदी साहित्य जळून खाक झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.