आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिकांनी जाणून घेतली प्लास्टिक बंदीबाबतची सविस्तर माहिती:विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सच्या सभागृहात कार्यशाळा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अॅड इंडस्ट्रीजच्यावतीने विदर्भ चेंबरच्या सभागृहात झालेल्या प्लास्टिक बंदी बाबतच्या कार्यशाळेत व्यावसायिकांनी प्लॉस्टिक बंदी बाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. शासनाने प्लॉस्टिक पिशव्यांसह सिंगल युज प्लॉस्टिकवर बंदी घातली आहे. या प्लॉस्टिकचा वापर करणाऱ्यांवर व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नेमके कोणत्या प्लॉस्टिकवर बंद आहे? याबाबत व्यावसायिकांमधील संभ्रम लक्षात घेवून या प्लॉस्टिक बंदी बाबतची अधिक माहिती व्यावसायिकांना व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ-उपप्रादेशिक कार्यालयाचे सब रिजनल ऑफिसर मनीष होळकर,फ्लोवेल इंडस्ट्रिजचे संदीप कोटक यांनी व्यावसायीकांना मार्गदर्शन केले.

प्लास्टिक वापरावर बंदी

मनीष होळकर व संदीप कोटक यांनी नेमक्या कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी आहे, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पी.पी.बॅग्ज, किराणा बॅग्ज, बीओपीपी बॅग्ज हे पॅकेजिंग मटेरिअल 50 मायक्रॉन व त्यापेक्षा जास्त असल्यास त्याला परवानगी आहे. तसेच व्यावसायिकांना काही संभ्रम अथवा माहिती हवी असल्यास त्यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

सदस्यांनी पुढाकार घेतला

प्रमुख पाहुण्याचे स्वागत चेंबरचे पूर्व अध्यक्ष कमलेश वोरा, पूर्व सचिव श्रीकर सोमण यांनी केले. प्रास्ताविक विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निकेष गुप्ता यांनी मांडले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मानद सचिव निरव वोरा यांनी केले. आभार सहसचिव निखिल अग्रवाल यांनी मानले. या कार्यशाळेला व्यापारी, उद्योजक, सलग्न असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आदी बहुसंख्येने उपस्थित होते. प्लास्टिक बंदी कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष चंदाराणा, कनिष्ठ उपाध्यक्ष राहुल गोयनका, कोषाध्यक्ष किशोर बाछुका यांच्यासह विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकारी, सदस्यांनी पुढाकार घेतला.

मनपा अधिकारी गैरहजर

या कार्याशाळेत प्लास्टिक बंदी बाबतची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही निमंत्रण दिले होते. व्यावसायीकांकडून प्लॉस्टिक बाबत दंड आकारणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र या कार्यशाळेला दांडी मारली. याबाबत व्यावसायिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...