आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • But There Is Scarcity Of Goods In The Market, Old Goods Are Being Sold; This Year, The Prices Of Rang And Gulal Have Gone Up By 30 Per Cent | Akola Marathi News

कोरोनानंतर होळीचा उत्साह:पण बाजारात मालाचा तुटवडा, जुन्या मालाची होतेय विक्री; यंदा रंग आणि गुलालाचे दर ३० टक्क्यांनी वाढले

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​मागील वर्षी कोरोनामुळे नागरिकांनी होळी व रंगोत्सव घरी साजरा केला. यंदा पुन्हा होळीचा उत्साह पूर्ववत दिसून येत आहे. रंगोत्सवासाठी चौका-चौकांमध्ये पिचकारी, गुलाल आणि ववििध रंगांची दुकाने सजली आहेत. मात्र, यावर्षी रंग, गुलाल व इतर साहित्यांच्या होलसेलमध्ये मागणीच्या तुलनेत पुरवठा नाही. त्यामुळे किरकोळमध्ये वस्तूंच्या किंमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

होळीच्या खरेदीसाठी होलसेल विक्रेते चार-पाच महिन्यांपूर्वी ऑर्डर देऊन ठेवतात. तीन-चार महिन्यांपूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट डोक्यावर होते. परिणामी होलसेल विक्रेत्यांनी अत्यंत कमी साहित्यांची ऑर्डर दिली. सध्या कोरोनाचा प्रकोप कमी झाला आहे. तसेच कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, रंगांच्या वाढलेल्या किंमतीमुळे उत्साहावर विरजण पडले आहे.अनेक विक्रेत्यांनी जुना माल विक्रीसाठी ठेवला आहे. पिचकारीमध्ये विविध कार्टुन्सचे प्रकार उपलब्ध आहेत. गुलाल, रंग खरेदी करताना नैसर्गिक रंगांना अधिक पसंती दिली जात आहे. नैसर्गिक रंग पॅकिंगमध्ये १०० रूपयांपुढेच उपलब्ध आहेत.

अशा आहेत किंमती : गुलाल १५० रूपये किलो, रंगाची ५० ग्रॅम डबी १०० रू., पिचकारी १० ते ५०० रूपयांपर्यंत विक्रीस आहे. दरवर्षी मोठ्या संख्येत विक्रेते गुलाल, रंग घेऊन चौका-चौकात विक्रिसाठी बसतात. मात्र, यंदा माल नसल्यामुळे दोन-दोन किलो माल विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. कोरड्या, डबीच्या रंगाचा सर्वाधिक तुटवडा आहे, अशी माहिती किरकोळ विक्रेते विनय कटारीया यांनी दिली.

होलिका दहनाचे शुभ मुहूर्त
यंदा होलिका दहन गुरुवारी १७ मार्चला आहे. १७ मार्चला होलीका दहनाची वेळ रात्री ९.६ ते १०.१६ पर्यंत आहे. ज्यांना भाद्रनंतर होलिका दहन करायचे असेल तर त्यांच्यासाठी मुहूर्त रात्री उशिरा १.१२ ते १८ मार्च रोजी सकाळी ६.२८ पर्यंत आहे.

बातम्या आणखी आहेत...