आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभरा खरेदी सुरू:पिंपळखुटा येथे हमीभावाने हरभरा खरेदी सुरू;  किसान राज अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने पुढाकार

बार्शीटाकळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हमीभाव योजनेअंतर्गत मार्केटिंग फेडरेशनद्वारा पिंपळखुटा येथे केंद्र सुरू झाले . या केंद्रावर हरभरा खरेदीचा शुभारंभ झाला. या केंद्रासाठी किसान राज अॅग्रो प्रोड्युसर कंपनीने पुढाकार घेतला.

कंपनीच्या संचालिका मालती भारत मांजरे यांच्याहस्ते काटापूजन झाल्यानंतर खरेदी सुरू केली. याप्रसंगी केंद्रावर हरभरा घेऊन आलेले शेतकरी कांताबाई मोरे, अशोक मोरे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतिष शेळके यांचे स्वागत किसान राज ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रकाश माणिकराव यांनी केले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कंपनी पुढाकार घेईल अशी ग्वाही प्रकाश माणिकराव यांनी याप्रसंगी दिली.

कंपनीचे संचालक दीपक राऊत, सीताराम लांजेवार, सतीश ढोमने, प्रताप अनिल सोनोने, सुनील आकोत, गोपाळ ढोरे, प्रदीप वाघ आदी उपस्थित होते. संदीप राठोड, लीना शास्त्री, भारत मांजरे, प्रतिक मांजरे, चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते. शासनाच्या हमीभावानुसार हरभरा प्रति किंटल ५२३० रुपये याप्रमाणे खरेदी सुरू असून शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करून हरभरा खरेदी केंद्रावर आणण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...