आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजपासून लग्नसराईला सुरुवात होत आहे. दोन वर्षानंतर लग्नसमारंभ धुमधड्याक्यात होणार आहे. त्यामुळे सराफा बाजारामध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. त्यात सराफा बाजारही दोन वर्षानंतर रुळावर येत आहे. सध्या दुकानांमध्ये लग्नसराईसाठी खरेदी सुरू झाली आहे. दररोज अकोला सराफा बाजारात सुमारे अडीत ते तीन कोटींची उलाढाल होत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन-रशिया संघर्ष अद्यापही मिटलेला नाही. याचा परिणाम सोन्याच्या भावावर पडतो आहे. दविसेंदविस किंमतींमध्ये तेजी आहे. तरी ग्राहकांकडून आवश्यक खरेदी केली जात आहे. पण साेने ५० हजाराखाली असते तर खरेदी वाढली असती, असे सराफा व्यावसायिक नरेश शाह सांगतात. लग्नसाराईसाठी प्रत्येकांचे एक विशिष्ट बजेट असते. भाव अधिक असल्यामुळे खर्च तेवढाच असला, तरी ग्राहकांना कमी दागिण्यांवर समाधान मानावे लागत आहे. सध्या बाजारात येणारे सर्वाधिक ग्राहक लग्नसराईचे आहे. यातील अनेकांनी दविाळी, दसऱ्याला खरेदी केली. काहींनी या मुहूर्ताला बुकिंग केली. सध्या त्यांचे ऑर्डर तयार आहे.
दविसेंदविस सोन्याच्या भावामध्ये तेजी आहे. त्यामुळे ज्यांनी पूर्वी दागिण्यांचे बुकिंग केले. त्यांना थोडा दिलासा आहे. याशविाय दविाळीनंतर महिलावर्गाकडूनही सोने खरेदी केले जात आहे. वर्षभर पैसे साठवूण दविाळीमध्ये अनेक माहेरवाशिणी सोने खरेदी करतात. या महिलांचीही दुकानांमध्ये गर्दी आहे. त्यामुळे सराफा मार्केटमध्ये चांगली रेलचेल आहे.
शेतकऱ्यांकडून खरेदी आणि विक्रीही
शेतकरी हाती पैसे असाल्यास सोने खरेदीस प्रथम पसंती देतो. खरीप पिकांचे पैसे शेतकऱ्यांच्या हाती येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सोने खरेदी करण्यात येत आहे. मात्र, यंदा अतविृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांकडे रब्बीची पेरणी करण्यासाठी पैसे हाती नाही. त्यामुळे ही मंडळी जवळ असलेले सोने विक्री किंवा गहाण ठेवण्यासाठी दुकानात येत आहे. सध्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांमध्ये १५ ते २० टक्के ग्राहक याप्रकारातील आहेत, असे या वेळी अकोला सराफा असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश खरोटे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.