आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समिती गठीत:संशयित आरोपी दाखवून काढले कॉल डिटेल ; पोलिस अधीक्षकांनी केली चौकशी समिती गठीत

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला पोलिसांनी संशयित आरोपी दाखवत अनेकांचे सीडीआर आणि एसडीआर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अॅड. नजीब शेख यांचा सीडीआर आणि एसडीआर काढण्यात आल्याने हा प्रकार उजेडात आला. यासंदर्भात अॅड. नजीब शेख यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. पोलिस अधीक्षकांनी यासंदर्भात चौकशी समिती गठित केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली आहे. नेमके कुणाच्या आदेशाने आणि कशासाठी हे रेकॉर्ड काढल्या गेले हे तपासात समोर येणार आहे.

अॅड. नजीब शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार, अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी पदाचा गैरवापर करून नामांकित वकील नजीब शेख यांना गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी दाखवून त्यांच्या मोबाइल नंबरचा सीडीआर आणि एसडीआर काढला. अॅड नजीब शेख यांच्या वैयक्तिक गोपनीयतेचे हनन केल्याप्रकरणी सपकाळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, पोलिस अधीक्षकांनी आंदोलनापूर्वीच तक्रारकर्त्यांशी चर्चा करून या प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर यांची नियुक्ती केली आहे. तसेच येत्या ७ दिवसांत तपास पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. अॅड. नजीब शेख यांनी सांगितले की, खदान पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडी गुन्ह्यात आपणास संशयित आरोपी दाखवून मोबाइल क्रमांकाचा सीडीआर आणि एसडीआर मिळवला होता ते गैरकायदेशीर आहे.