आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी अर्ज प्राप्त:जिल्ह्यात मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी शिबिर

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले हाेते. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील पाच मतदान संघातील २८ हजार २९२ मतदारांचे आधार जोडण्याकरीता(नमुना ६बी) नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत.

मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम १ ऑगस्टपासून राबवण्यात येत आहे. विद्यमान मतदारांकडून त्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी मतदार यादीतील त्यांच्या नोंदीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ही प्रक्रिया होणार आहे. त्याचप्रमाणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा त्याच मतदारसंघाचे नाव एकापेक्षा जास्त वेळा नोंदवले गेले किंवा कसे, याची पडताळणी करण्यासाठी याची मदत होणार आहे. विद्यमान मतदारांनी नमुना अर्ज क्रमांक ‘सहा ब’मध्ये आधार क्रमांक मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करावयाचा आहे. व्होटर हेल्पलाइन अॅप व https://nvsp.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याद्वारे ही मतदार आपला आधार क्रमांक नोंदवू शकतात, असे निवडणूक विभागाकडून कळवले आहे.

या मतदान केंद्रावर झाली नाेंदणी ः शिबिरामध्ये मतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी प्राप्त नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहेत. यात अकोट मतदार संघात २ हजार ४१०, बाळापूर येथे १० हजार ४८१, अकोला पश्चिम येथे १ हजार ६९३, अकोला पूर्व येथे ४ हजार ९९७ व मूर्तिजापूर येथे ८ हजार ७११ असे एकूण १ हजार ६८० मतदान केंद्रावर २८ हजार २८२ मतदारांचे नोंदणी अर्ज प्राप्त झाले आहे, असे , अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी कळवली आहे.

अशी झाली नाेंदणी
जिल्ह्यातील मतदारांचे नमुना ६ बी नोंदणीसाठी मतदारसंघनिहाय अर्ज प्राप्त झाले आहेत. यात अकोट येथे ३२ हजार ८४०, बाळापूर येथे ८० हजार ७३१, अकोला पश्चिम येथे ५ हजार ४१९, अकोला पश्चिम येथे १० हजार ६८५ व मूर्तिजापूर येथे ७६ हजार ४४५ असे एकूण २ लाख ६ हजार १२० मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...