आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छुकांमध्ये धाकधूक:प्रभागांची सीमा निश्चितीची प्रक्रिया रद्द; राजकीय हालचालींना ब्रेक

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभागासंदर्भात राज्य सरकार घेणार आता निर्णय

नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभागांची सीमा निश्चित करण्यासाठीची प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जारी केला आहे. प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारला प्राप्त झाले असून, नव्या रचनेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला ब्रेक लागला आहे. निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय नको, यासाठी, राजकीय पक्ष एकवटले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनयम आणि मराराष्ट्र जि. प. व पं. स. अधिनियम सुधारणा विधेयक, मुंबई मनपा अधिनियम, महाराष्ट्र मनपा अधिनियम, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम सुधारणा या दोन विधेयकांना मंजुरी प्रदान केली. परिणामी निवडणूक प्रक्रिया, प्रभाग रचना, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे अधिकारी राज्य सरकारकडे आले. त्यानुसार प्रभाग सीमा निश्चितीची प्रक्रियाच रद्द झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...