आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवारी अर्ज:आज सायंकाळपर्यंत करता येणार उमेदवारी अर्ज दाखल

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात होऊ घातलेल्या सात तालुक्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीद्वारे शुक्रवार, २ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत दिली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी याकरिता मुदत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...