आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात‎:राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघात‎

बोरगाव मंजू‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू ‎पोलिस ठाण्याच्या हद्दीत‎ वणी-रंभापूर नजीक अज्ञात‎ वाहनाच्या धडकेत कारमधील तीन ‎ ‎ प्रवासी गंभीर जखमी झाले, तर‎ कारचा चुराडा झाला. ही घटना‎ गुरुवारी दुपारी घडली.‎ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‎ एमएच ३० एएल १६०७ या‎ क्रमांकाच्या कारमधून चालक‎ जानसन वाघमारे वय ५४ व अनिल‎ सुखदेव चराटे वय ६०, लता‎ सुखदेव चराटे वय ५५ रा. मूर्तिजापूर‎ अकोलाकडून मूर्तिजापूरकडे‎ निघाले होते. दरम्यान वणी रंभापूर ते‎ पैलपाडा कॅनाॅलनजीक या कारला‎ अपघात झाला.

यात कारचा चुराडा‎ झाला, तसेच तिन्ही प्रवासी गंभीर‎ जखमी झाले.‎ घटनेची माहिती मिळताच‎ ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, हेकॉ.‎ संतोष निबेंकर, संजय भारसाकळे‎ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस‎ व मॉ चंडिका माता आपत्कालीन‎ व्यवस्थापन पथक, वंदे मातरम‎ आपत्कालीन व्यवस्थापन पथक‎ ‎कुरणखेड यांनी घटनास्थळी धाव‎ घेऊन कारमधून अडकून‎ पडलेल्या तिघांना बाहेर काढले.‎ जखमींना अकोला येथील‎ शासकीय रुग्णालयात दाखल‎ केले. नेमका अपघात कसा झाला,‎ हे वृत्त लिहिपर्यंत समज शकले‎ नाही. पुढील तपास पोलिस करत‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...