आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज चोरी:अकोल्यात वीज मीटरमध्ये छेडछाड करणारी टोळी सक्रीय, तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वीज ग्राहकांच्या मीटरचे काम दिलेल्या एका एजन्सीने वीज ग्राहकांकडून पैसे घेऊन मीटरमध्ये छेडछाड केल्याची घटना गुरुवारी समोर आली. महावितरणाकडून या प्रकरणी तक्रार केल्यावर अकोट पोलिसांनी 3 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणच्या अकोट उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गोपाळ अग्रवाल यांनी तक्रार दिल्यावर अकोट पोलिसांनी शरद गिरी, किशोर सावरकर आणि गोवर्धन वानखेडे यांच्या विरोधात भादंवि कलम 406, 420 आणि भारतीय विद्युत कायदा कलाम 138 आणि 139 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीकडे होती ही जबाबदारी

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अकोट उपविभागातील वीज मीटर वाचनाच्या नोंदीचे कंत्राट मेसर्स लेख एंटर प्राईस यांना दिले आहे. वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक नोंद घेण्यासाठी मीटरचे फोटो घेणे, ही जबाबदारी या संस्थेला दिली होती.

असा लागला शोध

उपकार्यकारी अभियंता गोपाळ अग्रवाल यांना गुप्त माहिती मिळाली की, एका वीज ग्राहकांच्या वीज मेटरमध्ये छेडछाड करून ते पुन्हा बसविण्यात आले आहे. याची खात्री करण्यासाठी अग्रवाल यांनी दहिहांडा शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता, जनमित्र बाळकृष्ण अलोणे आणि पंचांना सोबत घेऊन छेडछाड केलेल्या वीज मीटरची तपासणी केली. तपासणी दरम्यान गिनेस कंपनीच्या मीटरला मागून छिद्र केल्याचे आढळून आले. या प्रकारे शरद गिरी, किशोर सावरकर आणि गोवर्धन वानखेडे यांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले.

ग्राहकांने दिली कबुली

वीज मेटरमध्ये छेडछाड केल्याने मीटर वाचन करतेवेळी नोंदी अस्पष्ट दिसत होत्या. या कामी आपण वीज वाचनास येणाऱ्या कर्मचाऱ्यास दरमहा 100 देत असल्याची कबुली वीज ग्राहकाने दिली. महावितरणकडून लेखी तक्रार दिल्यावर अकोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वीज मेटरमध्ये छेडछाड करणे दंडनीय अपराध आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना शिक्षेची तरतूद वीज कायद्यात केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारांना शिक्षा झाल्या आहेत.