आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीला 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा:तलाठ्याला धक्काबुक्की आणि ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्याचे प्रकरण; जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौण खनीजाने भरलेला ट्रॅक्टर तलाठी यांनी अडवला होता. मात्र त्यांना धक्काबुक्की व लोटपाट करून आरोपी ट्रॅक्टर घेऊन पळून गेला होता. या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल एम. पाटील यांच्या न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल शुक्रवारी दिला.

शरद अजाबराव सरदार (वय 32 रा. गाेरेगाव, ता. मुर्तिजापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तलाठी नितीन रामदास देसले यांच्या पथकाने अवैध गौण खनिज वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर 2020 मध्ये कारवाई केली होती.

यावेळी ट्रॅक्टरचा मालक शरद अजाबराव सरदार व विनोद अजाबराव सरदार यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्मचारी यांना शिवीगाळ, लोटपाट व धक्काबुक्की करून अवैध खनिजासी ट्रॅक्टर पळवून नेला होता. अशा तक्रारीवरून पोलिसात अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हवालदार गोपाल भवाने यांनी तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध होण्याकरीता पाच साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी शरद अजाबराव सरदार यास भादंविचे कलम 353 अंतर्गत दोषी ठरवून दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भादंविचे कलम 379 अंतर्गत दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील आनंद गोदे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. तसेच पैरवी अधिकारी नारायण शिंदे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...