आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:दुसरे लग्न केल्याने महिलेला थुंकी चाटण्याची जात पंचायतीकडून शिक्षा, एक लाख घेऊन समाजातून बहिष्कृत

चोपडा (प्रवीण पाटील)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंचाचे जोडे पीडित महिलेने डोक्यावर घेऊन पंचाच्या पायावर नाक घासायची अशीही अमानुष शिक्षा सुनावली.

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील ३२ वर्षीय माहेरवाशीणीने पहिल्या पतीपासून फारकत घेऊन नंतर दुसरे लग्न केल्याने, तिला जात पंचायतीने केळीच्या पानावरील थुंकी चाटण्याची आमनुष शिक्षा सुनावली होती. तसेच पीडितेच्या नातेवाइकांकडून जातपंचायतीने एक लाख रुपये घेऊन त्यांना समाजातून बहिष्कृत केले होते. याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील दहा जणांवर चोपडा शहर पोलिसात १३ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

चहार्डी येथील माहेर
चहार्डी येथील माहेर आणि वडगाव (ता.बार्शीटाकळी, जि.अकोला) येथील सासर असलेल्या अर्चना बोडके यांनी, पहिल्या पतीपासून फारकत घेऊन पुनर्विवाह केला. त्यामुळे अकोला जात पंचायतीने ९ एप्रिल २०२१ रोजी वडगाव या गावी केळीच्या पानावर थुंकी चाटण्याची, तसेच पंचांचे जोडे डोक्यावर घेऊन पंचांच्या पायावर नाक घासण्याची शिक्षा सुनावली होती. दुसऱ्या पतीसोबत संसार करण्यास त्यांना जातपंचायतीने मनाई केली होती.

दहा जणांवर गुन्हा
याप्रकरणी एकनाथ सावळा शिंदे, प्रेमनाथ धर्मा शिंदे, गणेश नागोबा बाबर, शिवनाथ एकनाथ शिंदे, किसन शंकर सावंत, दिनेश भगवान चव्हाण, काशीनाथ रघुनाथ बाबर, कैलास एकनाथ शिंदे, कैलास नानू सावंत, संतोष विश्वनाथ शेगर (सर्व रा. वडगाव, पोस्ट-पिंजर, ता. बार्शीटाकळी) यांच्याविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात, पीडित महिलेच्या बहिणीचा मुलगा कल्पेश सुदाम बाबर (वय २६, रा.चहार्डी, ता.चोपडा) याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

पिंजर पोलिसात गुन्हा वर्ग
महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६ चे कलम ५,६ कलम ३४ प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्यातील घटना स्थळ हे पिंजर (जि.अकोला) पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळे हा गुन्हा पिंजर पोलिस स्टेशनला वर्ग केला आहे.

निर्णय मान्य नसेल तर धर्म बदलण्याचा आदेश
पीडितेेने वडगाव (जि.अकोला) येथील साईनाथ नागो बाबर यांच्याशी २०११ मध्ये विवाह केला होता. मात्र, पती दारू पिऊन मारहाण करत असल्याने २०१५ मध्ये घटस्फोट घेतला. अकोला जिल्ह्यातील नाथजोगी जात पंचायतीने हा घटस्फोट अमान्य केला. या महिलेने २०१९ मध्ये अनिल बोडके यांच्याशी पुनर्विवाह केला. हा विवाह मान्य नसल्याने जात पंचायतीने एक लाख रुपये दंड केला. तसेच विवाहितेसह तिच्या परिवारालाही बहिष्कृत केले. जात पंचायतींचा निर्णय मान्य नसेल तर पीडितेच्या कुटुंबाने धर्म बदलावा असा आदेश काढला आहे. दरम्यान, पीडितेने तक्रार केल्यानंतर अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व जातपंचायत विभाग प्रमुख कृष्णा चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाने पोलिसात तक्रार केली. जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे, वासंती दिघे, डॉ. अय्युब. आर. पिंजारी, शिरीष चौधरी, डॉ. नरेंद्र शिरसाठ यांनी पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...