आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीशा:भाव नसल्यामुळे एक हेक्टर वांगीच्या शेतात सोडली गुरे; शेतकर्यावर आर्थिक संकट

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खर्च वाढला आणि उत्पादनाला बाजारभाव नसल्याने संकटात सापडलेल्या बोर्डी येथील शेतकऱ्याने एक हेक्टर वांग्यांच्या शेतात गुरे सोडली आहेत.

प्रदीप ताडे यांनी एक हेक्टर शेतामध्ये वांग्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी महागडे रासायनिक खते आणि कीटकनाशकाची फवारणी केली होती. सध्या वांगी लागण्यास सुरुवात झाल्यानंतर खर्चानुसार बाजारभाव नसल्याने खर्च निघणार नाही, हे त्यांना कळल्यानंतर संकटात सापडलेल्या ताडे यांनी नाइलाजास्तव पिकात गुरे सोडली आहेत. वाढत्या रासायनिक खताच्या किमती कमी करून आपल्याला सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...