आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जातीय सलोखा कायम ठेवून उत्सव साजरे करा

आगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उरळ पोलिस स्टेशन अंतर्गतच्या हातरूण येथे ६ सप्टेंबरला शांतता समिती बैठकीचे आयोजन केले होते. उत्सव जबाबदारीने व एकोप्याने शांततेत पार पाडा, सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नका, असे आवाहन उरळचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी केले.

या वेळी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत सरपंच, ग्रा. पं. सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष तथा गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व गावकरी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतता समितीची बैठक संपन्न झाल्यानंतर ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी गणेश उत्सव मिरवणूक मार्गची पाहणी केली. या वेळी बिट जमादार शिवानंद मुंळे, गोपनीय कर्मचारी शैलेश घुगे, इंगळे मेजर, ट्रॅफिक कर्मचारी ठाकूर मेजर हजर होते.

बातम्या आणखी आहेत...