आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:जिल्ह्यात लम्पी प्रभावित गावांची केंद्रीय पथक आज करणार पाहणी

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवंशीय जनावरांमधील लम्पी चर्मरोगामुळे प्रभावित असलेल्या गावांची पाहणी मंगळवारी केंद्रीय पथक करणार आहे. या पथकात ितघांचा समावेश आहे. पथक अकाेला तालुक्यांतील गावांना भेटी देणार आहे. िजल्ह्यात आतापर्यंत १ हजार ७३६ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. लम्पी आजाराने थैमान घातले असून, या आजारांमध्ये अनेक जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांना जोडव्यवसाय व शेतीकामात महत्वाची भूमिका‎ जनावरांची असते. आधीच‎ शेतकऱ्यांवर स्मानी संकट‎ ओढावले असून, अतिवृष्टीमुळे‎ पिके पाण्याखाली गेली आहेत.‎

त्यात जोडधंदा म्हणून शेतकरी‎ बांधवांना त्यांच्याकडील‎ जनावरांच्या माध्यमातून संसार‎ चालवण्यासाठी थोडी मदत होत‎ होती, मात्र या आजाराने शेतकरी‎ आणखी आर्थिक संकटात‎ सापडला आहे. दरम्यान आता‎ प्रभावित गावांच्या पाहणीसाठी‎ केंद्रीय पथक मंगळवारी २२ नाेव्हेंबर‎ राेजी अकाेल्यात येत आहे.‎

जनावरे माेकाट : शहरात मोकाट‎ फिरणारे गुरे हे महापालिकेच्या‎ कोंडवाड्यात ठेवण्याची व्यवस्था‎ करण्यात आली असून,‎ त्याठिकाणी जनावरांना लागणारा‎ चारा देण्याची व्यवस्था आहे.‎

शिवाय दररोज पशुवैद्यकांनी‎ कोंडवाड्यातील जनावरांची‎ तपासणी करावी,असे निर्देशही‎ यापूर्वी झालेल्या एका बैठकीत‎ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले हाेते.‎ याशिवाय जे पशुपालक आपल्या‎ जनावरांना मोकाट सोडून देतात‎ त्यांची जनावरे कोंडवाड्यात ठेवली‎ जातील. तसेच पशुपालकांविरुद्ध‎ प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास‎ प्रतिबंध करणारा कायद्यान्वये गुन्हा‎ दाखल करण्यात येईल, असाही‎ इशारा देण्यात आला हाेता. मात्र‎ सध्या अनेक िठकाणी माेकाट‎ जनावरे फिरत आहेत.‎

येथे हाेणार पाहणी
केंद्रीय पथकातील सदस्य मंगळवारी सायंकाळी अकाेला तालुक्यात पाहणी करणार आहे. प्रभावित गावात कापशी, बाेरगाव मंजू, घुसरसह अन्य परिसराचा समावेश आहे. बुधवारी पथक अमरावतीकडे रवाना हाेईल.

यांना मिळाली मदत
जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची गत आठवड्यात बैठक झाली हाेती. बैठकीत सादर झालेल्या माहितीसार मृत्युमुखी पडलेल्या ९१३ जनावरांच्या पालकांना २ कोटी २६ लाख ३८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले हाेते.

अशी आहे माहिती : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगामुळे बाधित, मृत्यूसह अन्य माहिती पुढीलप्रमाणे आहे. बाधित : २९ हजार ७१७, लसीकरण : २ लाख ७ हजार ४५७, बरे झालेले : २६ हजार १५९,मृत्यु : १७३६, अत्यवस्थ : २५५, उपचार हाेत असलेले : १ हजार २२.

बातम्या आणखी आहेत...