आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाज संगठन आपल्या दारी अंतर्गत नव उपक्रम अकोला माहेश्वरी समाज ट्रस्ट द्वारा श्रीमती ल. रा. तो. माहेश्वरी भवनात ‘चाय पर चर्चा’ हा आगळावेगळा उपक्रम मोठ्या उत्साहात नुकताच झाला.
यात प्रथम चर्चा सत्रात उपस्थित बंधूनी समाजहित बघत सकारात्मक प्रस्ताव सभेत सादर केले. यात विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध सोयी, समाजात बिघडत चाललेले नातेसंबंध, ‘लव जिहाद’ वर चिंतन व निवारण, पगडी रस्मचे स्वरूप, लग्नात मर्यादित पदार्थ ठेवण्यासाठी आवाहन, गरजू समाज बांधवांना वैद्यकीय सहाय आदी समाजहिताच्या बाबी माहेश्वरी समाज ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, माजी प्रधानमंत्री चौथमल सारडा, गोविंद बजाज, जय बांगड, डॉ. अनिल तोष्णिवाल, पवन माहेश्वरी, संतोष सोनी, डॉ. चंद्रकांत पनपालिया, पुरूषोत्तम पनपालिया, संजय हेडा, रमेश मालपाणी, गोविंद राठी, प्रा. रत्ना चांडक, उमा भाला, उषा बाहेती, अर्चना रांदड, ज्योती बाहेती आदींनी मांडून चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालिया, उपाध्यक्ष शांति लाल भाला, कोषाध्यक्ष डॉ. आशिष पनपालिया, अंकेक्षक अनिल लटुरिया, सहायक मंत्री विनीत बियाणी, महिला मंडल अध्यक्षा श्रीमती हेमा खटोड, वरिष्ठ नागरिक प्रकोष्ठ अध्यक्ष भगवान दास तोष्णीवाल, महिला प्रकोष्ठ अध्यक्षा शारदा मंत्री, महिला मंडल सचिव वंदना हेडा, वरिष्ठ महिला प्रकोष्ठ सचिव सुलोचना सिंगी, प्रगती मंडल सचिव संकेत चांडक व नवयुवती मंडल अध्यक्ष श्रद्धा धूत उपस्थित होते.
संचालन प्रधानमंत्री विजयकुमार राठी यांनी तर उपाध्यक्ष सुधीर रांदड यांनी आभार मानले. या चर्चा सत्रात समाज ट्रस्टचे प्रा. डॉ. रमण हेडा, दिपक राठी यांनी सहकार्य केले. चर्चा सत्रात ट्रस्टचे पुरूषोत्तम खटोड, राजेश लोहिया, मनीष लढढा, द्वारका दास चांडक, नंदकिशोर बाहेती, शैलेश तोष्णीवाल, मनोज चांडक, प्रमोद लटुरिया, महेश मुंदडा आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.