आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी येथील चौघांनी रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होते. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी चारही आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
कान्हेरी गवळी येथील गीताबाई मुंडे यांनी पोलिसांना सांगितले होते की, की त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुनीता मुंडे हिने हातउसने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून गीताबाईला २६ जून २०१४ रोजी रात्री ८ वाजता अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात बाळापूर पोलिसांनी चौकशी व तपास करून आधी भादंविच्या कलम ३०७ प्रमाणे व नंतर मृत्यूपूर्व बयानवरून कलम ३०२ प्रमाणे गुन्हे दाखल करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेण्यात आल्या. तपास अधिकारी मनीषा राऊत, पीएसआय, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सुद्धा जबाब नोंदवला. या प्रकरणातील मृत्यूपूर्व जबाब तसेच नऊ साक्षीदार न्यायालयाने तपासले. त्यानंतर सबळ पुराव्या अभावी चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. दिलदार खान, अॅड. एस. एन. ठोकळ, अॅड. कोमल सोळंके यांनी न्यायालयात बाजू मांडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.