आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश‎:पारस येथील दुर्घटनेची‎ एसडीओ करणार चाैकशी‎

‎‎अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारस येथील बाबुजी‎ महाराज संस्थानात सभामंडपावर झाड‎ कोसळून झालेल्या दुर्घटनेची बाळापूर‎ उपविभागीय दंडाधिकारी चाैकशी‎ करणार आहेत. याचा आदेश प्रभारी‎ जिल्हाधिकारी, जि. प.चे मुख्य‎ कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार‎ यांनी मंगळवारी ११ एप्रिलला दिला.‎ बाळापूर तालुक्यात साेमवारी १०‎ एप्रिलला समर्थ बाबूजी महाराज‎ महाराज संस्थानमध्ये सायंकाळी‎ आरतीसाठी ५०० जण एकत्र आले.‎ काही जण टिनशेडमध्ये गेले. मात्र‎ शेडवर झाड काेसळल्याने ४० जण‎ दबले हाेते. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू‎ झाला हाेता. २९ जण जखमी झाले‎ हाेते. दरम्यान उपराेक्त दुर्घटनेची‎ चाकैशी करून भविष्यात अशा घटना‎ टाळण्यासाठी काेणत्या उपाय याेजना‎ करता येतील, याचाही उल्लेख‎ अहवालात करण्यात यावा, असेही‎ आदेशात नमूद करण्यात आले आहे.‎