आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अग्रगामी शाळेच्या विरोधात‎ पालकांचे साखळी उपोषण‎

वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हसाळा येथील अग्रगामी‎ शाळेच्या मनमानी कारभारामुळे‎ त्रस्त झालेल्या पालकांनी शाळेच्या‎ विरोधात महात्मा गांधीजींच्या‎ पुतळ्यासमोर साखळी उपोषण सुरू‎ केले आहे.‎ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत‎ नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.‎ शाळेमधूनच पुस्तके खरेदी‎ करण्याची अट घातली जात आहे.‎ उत्तीर्ण झाल्यानंतरही त्या विद्यार्थ्यांस‎ पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी‎ प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली‎ जाते. पालकांनी शुल्क न‎ भरल्यामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण‎ मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न‎ शाळेकडून होत आहे.

२०२३-२४ या‎ शैक्षणिक सत्राचे शुल्क वाढ केली‎ असून, ती मागे घेण्यात यावी,‎ अतिरिक्त शुल्क आकारल्या जात‎‎‎‎‎‎ असल्याने त्रस्त झालेल्या पालकांनी‎ १० एप्रिलपासून महात्मा गांधीजींच्या‎ पुतळ्या समोर साखळी उपोषण‎ सुरू केले आहे. शाळेच्या‎ व्यवस्थापन समितीने मागण्या मान्य‎ न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात‎ येणार असल्याचे‎ उपोषणकर्त्यांकडून सांगितले जात‎ आहे. शाळेच्या विरोधातील‎ तक्रारीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना‎ देण्यात आले आहे. यावेळी जयंत‎ अंबुलकर, अजय शेवाळकर, राम‎ मुरारका, विपिन टाले, संघरत्न‎ रामटेके, राजेंद्र मिश्रा यांच्यासह‎ पालकांनी उपस्थिती लावली.‎