आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ईटावा वार्डातील सप्तशृंगी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाला रामनवमीपासून ते दि. ७ एप्रिल पर्यंत मंदिराच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्ती भावाने नवरात्र उत्सव पार पडला.पुसद येथील कीर्तिमान बाबाराव लेवेकर, पत्नी कमल लेवेकर यांच्या भक्तीतून साकारलेले सप्तशृंगीचे मंदिर आहे. त्याच भक्ती भावनेतून वारसा हक्काने रमेश चव्हाण व अनिल चव्हाण परिवारातर्फे परंपरा चालवीत आहेत. पुसद ते दिग्रस रोडवर स्थित असलेल्या सप्तशृंगीची मूर्ती अवघ्या महाराष्ट्रात आराध्य दैवत म्हणून मानली जात आहे.
सदर मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार याही वर्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सतत सात दिवस होम हवन दररोज दोन्ही वेळेस पूजा व आरती तसेच गुरुचरित्राचे पारायण सात दिवस करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी भजन दिंड्यासह अनेक वाद्यांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील ध्वज निशाण व सजवलेली घोडी विशेष आकर्षण ठरले. भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्या सारखा देखावा मिरवणुकीतून सादर करण्यात आला होता. मिरवणुकीत असंख्य प्रतिष्ठित नागरिक, पुरुष, महिला, मुले, मुली सहभागी झाले होते.
मिरवणूक ईटावा वार्ड मधील संत हनुमंता बापू मंदिर, मारुती मंदिर, महाकाली मंदिर, वाघामाय मंदिर, जगदंबा मंदिर या मार्गावरून प्रस्थान करून सप्तशृंगी देवी मातेच्या मंदिरात देवीच्या चरणी भाविक लीन झाले. या विशेष सोहळ्यात माऊली महिला भजनी मंडळ ईटावा वार्ड, जगदंबा महिला भजनी मंडळ ईटावा वार्ड, पिंपळगाव येथील महादेव भजनी मंडळ व निंबी येथील महिला भजनी मंडळ व हनुमंता बापू भजनी मंडळ यांचा सहभाग होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.